Friday, October 2, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंडेंना डावलल्याची भावना, समर्थकांचे राजीनामे, भाजपा प्रवक्त्यांचे आगीत तेल!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pankaja pritam

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थक नाराजी व्यक्त करत आहेत. बीडमधील नाराज मुंडे समर्थकांनी  एकापाठोपाठ राजीनामे दिले असून या नाराजीचे पडसाद आता अहमदनगरपर्यंत पोहोचले आहेत. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यामान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचे पती गोकुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याच पारर्श्वभूमीवर आता भाजपा नेत्यांनी राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यानं राजीनामे देणारे भाजपशी एकनिष्ठ नसल्याचा आरोप करून आगीत तेल ओतले आहे. यामुळे वातावरण अधिकचं पेटलंय.

पदाधिकाऱ्यांपासून पंचायत समिती सभापती तसेच जिल्हा उपाध्यक्षांचा राजीनामा-

  • आतापर्यंत बीडमधील २५ बाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
  •  नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे.
  • भाजपा जिल्हा सरचिटनीस सर्जेराव तांदळे, जिल्हा परिषद सदस्य सविता बडे, पंचायत समिती सदस्य  प्रकाश खेडकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
  • याच नाराजीच्या भावनेतून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यमान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
  • दौंड यांच्या राजीनाम्याबरोबरच त्यांचे पती गोकुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय.
  • या दोघांनीही आपले राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सोपवले आहेत.

गणेश हाकेंचं आगीत तेल-

  • भाजप नेते गणेश हाके म्हणाले, “केंद्रीय मंत्रिमंडळाची जी पुनर्रचना झाली त्यात प्रीतम मुंडे यांचा समावेश झाला नाही.
  • त्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचं मी ऐकलंय.
  • परंतु हे अत्यंत चुकीचं आहे.
  • पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि अंतिमतः आपण असतो.
  • हीच भारतीय जनता पक्षाची विचारसरणी आहे.
  • भाजपचे जे पक्षांतर्गत निर्णय होतात ते पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून होतात.
  • त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात ज्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे तो पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून झाला आहे.
  • अशावेळी व्यक्तीला महत्त्व न देता पक्षाला महत्त्व द्यायला हवा.
  • पक्षाने घेतलेला निर्णय योग्य आणि पक्ष हिताचा आहे असंच भाजपचे निष्ठावान समजतात.
  • त्यामुळे राजीनामे देणार पदाधिकारी भाजपचे निष्ठावान नाहीत असं मला वाटतं.
  • केवळ प्रीतम मुंडे यांना पद दिलं नाही म्हणून राजीनामे देणं योग्य नाही.

Tags: BJPpankaja mundepritam mundeकेंद्रीय मंत्रिमंडळगणेश हाकेपंकजा मुंडेप्रीतम मुंडेभाजप
Previous Post

घुमे गजर हरिनामाचा, भक्त नामात रंगला…

Next Post

दृष्टीहीनही पोहचावा मुक्कामी, वारीचं व्यवस्थापन असं भारी!

Next Post
wari

दृष्टीहीनही पोहचावा मुक्कामी, वारीचं व्यवस्थापन असं भारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!