मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थक नाराजी व्यक्त करत आहेत. बीडमधील नाराज मुंडे समर्थकांनी एकापाठोपाठ राजीनामे दिले असून या नाराजीचे पडसाद आता अहमदनगरपर्यंत पोहोचले आहेत. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यामान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचे पती गोकुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याच पारर्श्वभूमीवर आता भाजपा नेत्यांनी राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यानं राजीनामे देणारे भाजपशी एकनिष्ठ नसल्याचा आरोप करून आगीत तेल ओतले आहे. यामुळे वातावरण अधिकचं पेटलंय.
पदाधिकाऱ्यांपासून पंचायत समिती सभापती तसेच जिल्हा उपाध्यक्षांचा राजीनामा-
- आतापर्यंत बीडमधील २५ बाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
- नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे.
- भाजपा जिल्हा सरचिटनीस सर्जेराव तांदळे, जिल्हा परिषद सदस्य सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
- याच नाराजीच्या भावनेतून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या विद्यमान सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
- दौंड यांच्या राजीनाम्याबरोबरच त्यांचे पती गोकुळ दौंड यांनीसुद्धा भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय.
- या दोघांनीही आपले राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सोपवले आहेत.
गणेश हाकेंचं आगीत तेल-
- भाजप नेते गणेश हाके म्हणाले, “केंद्रीय मंत्रिमंडळाची जी पुनर्रचना झाली त्यात प्रीतम मुंडे यांचा समावेश झाला नाही.
- त्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचं मी ऐकलंय.
- परंतु हे अत्यंत चुकीचं आहे.
- पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि अंतिमतः आपण असतो.
- हीच भारतीय जनता पक्षाची विचारसरणी आहे.
- भाजपचे जे पक्षांतर्गत निर्णय होतात ते पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून होतात.
- त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात ज्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे तो पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून झाला आहे.
- अशावेळी व्यक्तीला महत्त्व न देता पक्षाला महत्त्व द्यायला हवा.
- पक्षाने घेतलेला निर्णय योग्य आणि पक्ष हिताचा आहे असंच भाजपचे निष्ठावान समजतात.
- त्यामुळे राजीनामे देणार पदाधिकारी भाजपचे निष्ठावान नाहीत असं मला वाटतं.
- केवळ प्रीतम मुंडे यांना पद दिलं नाही म्हणून राजीनामे देणं योग्य नाही.