मुक्तपीठ टीम
देशाची आर्थिक राजधानी मुंबईची हवा दिल्ली आणि अहमदाबादच्या हवेपेक्षा चांगली आहे. ती तुलनेनं कमी प्रदूषित आहे. मुंबईने वर्षभरात विविध स्त्रोतांमधून ४५ गीगाग्राम पार्टिक्युलेट मॅटर पीएम २.५ उत्सर्जित केले, तर दिल्लीने ७७ गिगाग्राम आणि अहमदाबादने ५७ गिगाग्राम पीएम २.५ उत्सर्जित केले. पीअर-रिव्ह्यू आंतरराष्ट्रीय जर्नल एल्सेवियरमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालातून हे उघड झाले आहे. पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाअंतर्गत सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च म्हणजेच सफर प्रकल्पाचे काम चालते. सफरचे संस्थापक संचालक डॉ. गुफरान बेग यांच्या टीनने तयार केलेल्या मॉडेलनुसार हे संशोधन झाले आहे.
अर्थात यामुळे मुंबईकरांनी फार आनंदात मश्गूल होऊ नये. कारण एकंदरीतच भारतातील वायू प्रदूषणाच्या धोक्याचा अंदाज या संशोधनावरून लावला जाऊ शकतो. शिकागो विद्यापीठाच्या ऊर्जा धोरण संस्थेत एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स-२०१९ चा अहवाल प्रकाशित झाला होता. ज्यामध्ये ४० टक्के भारतीय नागरिकांना वायू प्रदूषणामुळे ९ वर्षांपेक्षा कमी आयुष्य याचा धोका होता.
सफरच्या मॉडेलमुळे तीन दिवसाच्या प्रदूषणाचा अंदाज
- दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि पुणे या चार महानगरांमध्ये वायू प्रदूषणाच्या पातळीवर माहिती गोळा करण्यासाठी सफरने एक मॉडेल तयार केले.
- या मॉडेलचा संशोधन अहवाल प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल एल्सेवियरमध्ये प्रकाशित झाला आहे.
- यामुळेच, भारताला जास्तीत जास्त तीन दिवस वायू प्रदूषणाचा अंदाज जारी करण्यात क्षमता मिळाली.
- हवेत पीएम २.५ ची उपस्थिती घातक आहे कारण यामुळे फुफ्फुसांशी संबंधित रोग होतात.
कोणत्या शहरात उत्सर्जनाचे प्रमाण जास्त आहे?
- सफरच्या संशोधन अहवालानुसार, दिल्लीत वाहतुकीमुळे सर्वाधिक ४१ टक्के पीएम २.५ उत्सर्जन होते.
- तर मुंबईत ३१ टक्के, अहमदाबादमध्ये ३५ टक्के आणि पुण्यात ४० टक्के पीएम २.५ या स्त्रोतापासून उत्सर्जित होते.
- मुंबईच्या झोपडपट्टी भागात कचरा आणि इतर गोष्टी मोकळ्या जागी जाळल्यामुळे, जैव इंधन प्रदूषणात पीएम २.५ चे पुरावे जास्त आहेत.
- पीएम २.५ चे पुरावे मुंबईतील १५ टक्के जैव-इंधन प्रदूषण, दिल्लीमध्ये ३ टक्के, अहमदाबादमध्ये १० टक्के आणि पुण्यात ११ टक्के आढळले आहेत.
- पीएम २.५ हे पुण्यात सर्वाधिक २२ टक्के औद्योगिक प्रदूषणात सापडले आहे.
- त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये १९ टक्के, अहमदाबाद १९ टक्के आणि मुंबईत १५ टक्के औद्योगिक प्रदूषण आहे.तुमची साधी कार कशी होऊ शकते ई-कार?