Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई पोलिसांचा संडे स्ट्रीट उपक्रम कौतुकास्पद – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

June 20, 2022
in चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
संडे स्ट्रीट उपक्रम 1 (1)

मुक्तपीठ टीम

मुंबई पोलिसांच्या वतीने नरिमन पॉईंट येथे संडे स्ट्रीट उपक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होते. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.            

संडे स्ट्रीट उपक्रम 2

मुंबई शहरातील लोकांना तणावमुक्त वातावरणामध्ये वावरता यावं. त्यांना मनोरंजन, योगा, जॉगिंग, सायकलिंग आणि सांस्कृतिक खेळ यांसारख्या कार्यक्रमांचा आनंद घेता यावा याकरिता मुंबई पोलिसांमार्फत ‘संडे स्ट्रीट‘ संकल्पना राबवण्यात येत आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.            

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, संडे स्ट्रीट अतिशय चांगला उपक्रम असून तो सातत्याने सुरु राहिल असा विश्वास वाटतो. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील विविध भागात याचे आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिसांमधील कलागुणांना वाव मिळतो आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे.            

यावेळी अभिनेता अक्षय कुमार म्हणाले, कोविड काळात सर्वत्र शांतता होती. परंतु आता दिसणारे हे चित्र दिलासादायक आहे. संडे स्ट्रीट कल्पना कायम स्वरूपी राबवावी. पोलिसांचे लोकांसोबत संबंध दृढ करण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे.            

मुंबईमध्ये आज एकूण १३ ठिकाणी ‘संडे स्ट्रीट‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचे मुंबईकरांनी स्वागत केले असून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tags: Akshay Kumardilip walse patilmumbai policeNariman PointSunday Street Programmeगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलमुंबई पोलिससंडे स्ट्रीट उपक्रम
Previous Post

पोलादाच्या टाकाऊपासून टिकाऊ पोलादी रस्ता!

Next Post

दहावा आमदार कुणाचा? बविआचे क्षितिज ठाकूर अमेरिकेतून कुणासाठी परतले?

Next Post
bhai jagtap kshitij and prasad lad

दहावा आमदार कुणाचा? बविआचे क्षितिज ठाकूर अमेरिकेतून कुणासाठी परतले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!