Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दहावा आमदार कुणाचा? बविआचे क्षितिज ठाकूर अमेरिकेतून कुणासाठी परतले?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bhai jagtap kshitij and prasad lad

मुक्तपीठ टीम

सोमवारी २० जून रोजीचा दिवस भाजपा विजयाचा १० जूनसारखा असणार की महाविकास आघाडी एकत्रितपणे लढून विजय मिळवणार, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे होत आहेत. त्यातही राज्यसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या अपक्ष आणि छोट्या पक्षांपैकी एक बविआ आमदार क्षितिज ठाकूर अमेरिकेतून मुंबईत परतले आहेत. ते कुणाच्या सांगण्यावरून परतले त्यावरही विजयाचा काटा कुणाकडे झुकणार ते ठरणार आहे.

खरंतर आकड्यांचा विचार केला तर महाविकास आघाडीकडे अगदी राज्यसभा निकालाचा विचार केला तरी भाजपापेक्षा आमदारांचं बळ जास्त आहे. पण राज्यसभेला बळ असूनही पराभव पत्करावा लागलेल्या शिवसेनेच्या मनात काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल नाराजीची भावना असल्याने आतापर्यंत शिवसेनेची भूमिका स्पष्ट नाही. त्यांनी जर आपल्या दोन उमेदवारांच्या विजयासाठी आवश्यक मते राखत उर्वरित काँग्रेसकडे वळवली तर काम सोपे होणार आहे. तसेच अपक्ष आणि छोटे पक्ष यांना भाजपाचे लाड प्रसाद वाटून पटवतात की काँग्रेसच्या जगतापांची भाईगिरी चालते हेही महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ लक्षात घेतले आणि काही वेगळं घडलं नाही तर त्यांचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयाचा मार्ग सहज पार करतील. तसेच भाजपाचे पाच उमेदवार सहज विजयी होतील. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांचे चित्र स्पष्ट आहे. पण दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात जबरदस्त टक्कर होण्याची शक्यता आहे. भाई जगताप यांना विजयासाठी १० अतिरिक्त आमदारांची गरज आहे, तर लाड यांना विजयासाठी २२ अतिरिक्त आमदारांची गरज आहे.

अपक्ष – छोटे पक्ष आणि शिवसेनेचा कोटा…

  • भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांचा विजय लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या बळावरच होणार आहे.
  • ते बळ ज्या उमेदवाराच्या पाठीशी असेल त्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे.
  • त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते त्यांना प्रभावित करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
  • बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांवर बरंच काही अवलंबून आहे.
  • तसंच शिवसेनेकडे किमान नऊ अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत.
  • त्यांच्या दोन उमेदवारांच्या विजयासाठी आवश्यक कोटा ते ऐनवेळी जाहीर करणार आहेत. त्यानंतर उरलेली त्यांनी भाई
  • जगतापांकडे फिरवली तर ते विजयी होऊ शकतील.

Tags: Khsitij ThakurMLC ElectionMLC Election 2022mumbaiक्षितिज ठाकूरबविआमुंबई
Previous Post

मुंबई पोलिसांचा संडे स्ट्रीट उपक्रम कौतुकास्पद – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Next Post

पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी खास प्रयत्न

Next Post
Pandharpur Wari

पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी खास प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!