Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई पोलिसांकडून ३ वर्षात १३१ कोटींचा ३,४१४ किलो मुद्देमाल जप्त

अंमली पदार्थ विरोधी माफियांविरोधात गेल्या तीन वर्षात वाढती कारवाई

November 3, 2021
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
काश्मीर ते मुंबई ड्रग्स स्मगलिंग! महिलांचं कव्हर! मुंबईत चार आरोपींकडून २४ किलो ड्रग्स जप्त!

मुक्तपीठ टीम

मागील ३ वर्षात मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत २०८ गुन्हे दाखल केले असून यात २९८ आरोपींना अटक केली आहे. मागील ३ वर्षात १३१ कोटींचा ३४१४ किलो मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलिसांनी दिली आहे. मागील ३ वर्षात यावर्षी कारवाईत ७ पटीने वाढ झाली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे मागील ३ वर्षात अंमली पदार्थ आणि अन्य उत्तेजक पदार्थ अंतर्गत माहिती विचारली होती. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप काळे यांनी अनिल गलगली यांस प्रादेशिक विभागनिहाय माहिती उपलब्ध करुन दिली आहे.
एकूण ५ युनिट कार्यरत असून यात दक्षिण प्रादेशिक विभाग- आझाद मैदान युनिट, मध्य प्रादेशिक विभाग- वरळी युनिट, पश्चिम प्रादेशिक विभाग- बांद्रा, पूर्व प्रादेशिक विभाग- घाटकोपर युनिट, उत्तर प्रादेशिक विभाग- कांदिवली युनिट अशी सरंचना आहे. अनिल गलगली यांस सन २०१९, सन २०२० व सन २०२१ ( दिनांक २०/१०/२०२१ पर्यंत) रोजी पर्यंत एनडीपीएस अंतर्गत केलेल्या कारवाईची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. या विविध अंमली पदार्थात गांजा, चरस, एमडी, कोकेन, एमडीएमए, कोडेइन, ओपीम,  एलएसडी पेपर्स, अल्परझोअम, नेत्रावेत टॅब्लेट याचा समावेश आहे.

सर्वाधिक मुद्देमाल २०२१ मध्ये जप्त

drugs Racket

सन २०१९ आणि सन २०२० च्या तुलनेत सन २०२१ मध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष अधिक सक्रिय झाला असून २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत कारवाई ७ पटीने वाढली आहे. सन २०१९ मध्ये ३९४.३५ किलो मुद्देमाल जप्त केला असून यात १३४३ स्ट्रीप्स, ७५७७ बॉटल्स आणि १५५१ डॉट मिली ग्राम आहे. याची एकूण किंमत २५.२९ कोटी इतकी आहे. सन २०२० मध्ये ४२७.२७७, किलो मुद्देमाल जप्त केला असून यात ५१९१ बॉटल्स, ६६००० टॅब १४ डॉट मिली ग्राम आहे. याची एकूण किंमत २२.२४ कोटी इतकी आहे. तर २० ऑक्टोबर २०२१ च्या वर्षी  २५९२.९३ किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि १५८३० बॉटल्स व 189 एलएसडी पेपर्स सुद्धा आहे ज्याची किंमत ८३.१९ कोटी इतकी आहे.

सर्वाधिक गुन्हे आणि अटक आरोपी २०२१ मध्ये

अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सन २०१९ आणि सन २०२० च्या तुलनेत सन २०२१ मध्ये सर्वाधिक गुन्हे नोंद तर केलेच तसेच अटक आरोपी सुद्धा सर्वाधिक होते. २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत एकूण ९४ गुन्हे नोंद झाले ज्यात अटक आरोपींची संख्या १३७ आहे. सन २०१९ मध्ये ७० गुन्ह्यात १०३ आरोपींना अटक करण्यात आली तर सन २०२० मध्ये फक्त ४४ गुन्ह्याची नोंद झाली ज्यात आरोपी अटक संख्या ५८ होती.

 

अनिल गलगली यांच्या मते या कारवाईत अजून भर पडू शकते यासाठी स्थानिक पातळीवर गुन्ह्यात वाढ झाली तर त्या पोलीस ठाण्याच्या अधिकारी वर्गाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. कारण अंमली पदार्थ विरोधी कक्षाला माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्षात कारवाईत वेळ जातो आणि काही वेळा आरोपी फरार होतात. यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती आणि धडक कारवाईची अपेक्षा आहे.

Tags: Anil Galgalimumbai policeअनिल गलगलीमुंबई पोलीससंदिप काळे
Previous Post

एका दिवसात १५ हजार किलो सोन्याची खरेदी, ग्राहकांकडून ७५ हजार कोटी खर्च! महाराष्ट्रात सर्वाधिक खरेदी!!

Next Post

राज्यात १,१९३ नवे रुग्ण,  १,५१९ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post
corona

राज्यात १,१९३ नवे रुग्ण,  १,५१९ रुग्ण बरे होऊन घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!