मुक्तपीठ टीम
प्रजासत्ताक दिनापासून मुंबईतील महिलांच्या सुरक्षेसाठी सक्रिय झालेल्या निर्भया पथक उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. महिलांवर मुंबईत कुठेही संकट आलं तरी त्यांनी फक्त १०३ क्रमांक दाबावा, काही वेळातच तिथं निर्भया पथकाची गाडी पोहचणार, अशी हमी पोलिसांनी दिली आहे. बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी एका व्हिडीओतन निर्भया पथकाचं कौतुक केलं आहे. तर बॉलिवूडच्या अन्य सेलिब्रिटींनीही निर्भया पथकाची प्रशंसा केली आहे.
रोहित शेट्टींनी तयार केलेल्या व्हिडीओतून आधी तर समस्या मांडली आहे. मुंबईच्या रस्त्यावर वेगवेगळ्या वयोगटातील महिला त्यांच्या कामासाठी बाहेर असताना दिसत आहेत. एखादी महिला एकटी चालली आहे, कुणी बसमधून प्रवास करत आहे, तर कुणी महिला कार चालवत आहे. त्यांचा गैरफायदा घेण्यासाठी काही विकृत प्रवृत्ती प्रयत्न करतात. त्या महिला काहीशा भांबावतात. पण काही वेळातच त्या महिला सावध होतात. त्या महिला त्यांच्या फोनवरून १०३ डायल करतात. काही वेळातच त्या महिला जिथं असतात तिथं पोलिसांच्या निर्भया पथकाची गाडी पोहचते. त्या विकृतांना जेरबंद करते.
सेलिब्रिटींकडून महिलांच्या जागरुकतेसाठी व्हिडीओ शेअर
कटरिना कैफने आपल्या इंन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत असताना त्यांनी लिहिलं आहे की, निर्भया पथक महिलांसाठी मुंबईत कार्यरत आहे. हे महिलांच्यासाठी बनवण्यात आलं आहे. १०३ नंबर हा फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आला आहे. ज्यावेळी एखाद्या महिलेला अडचण निर्माण होईल तेव्हा त्यावेळी निर्भया पथक तुमच्यासोबत असेल. त्यावेळी तुम्ही विकृत प्रवृत्तीला धडा शिकवू शकता.
विकी कौशलनेही मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचा व्हिडीओही शेअर करत महिलांनी त्यांच्या फोनच्या स्पीड डायलमध्ये नेहमी १०३ नंबर सेव्ह करावा, असे आवाहन केले आहे.
कतरिना कैफशिवाय शाहिद कपूर, विकी कौशल आणि सारा अली खान यांनीही मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना शाहिद म्हणाला, की ‘मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्ह्यांचे प्रमाण वाढू नये यासाठी म्हणून आवश्यक पाऊल उचलले आहे. हा चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे.
सारा अली खानने तिच्या स्टोरीमधून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ:
हेही वाचा:
मुंबईकर महिलांनो, आता १०३ क्रमांक डायल करा, “निर्भया” पथकाचं सुरक्षा कवच मिळवा!
मुंबईकर महिलांनो, आता १०३ क्रमांक डायल करा, “निर्भया” पथकाचं सुरक्षा कवच मिळवा!