मुक्तपीठ टीम
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी एनआयएने आणखी एक कारवाई केली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिस गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील माने यांना एनआयएने अटक केली आहे. यापूर्वी एनआयएने सचिन वाझे आणि रियाझ काझी यांनाही या प्रकरणात अटक केली आहे.
अंबानी प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील संशयी भूमिकेमुळे एनआयएने गुरुवारी मुंबई पोलिस निरीक्षक सुनील माने यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
अन्टिलिया स्फोटक प्रकरणात अटक झालेला माने मुंबई पोलिसातील तिसरा अधिकारी आहे. यापूर्वी सहाय्यक पोलिस निरीक्षक वाझेसह सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझीला सुद्धा अटक करण्यात आली.सूत्रांच्या माहितीनुसार, काझीच्या जबाबानंतरच सुनिल मानेला अटक करण्यात आली.
नेमकं काय आहे प्रकरण
- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटक सामग्रीसह एसयूव्ही आणि त्यानंतर ठाणे व्यापारी मनसुख हिरण यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबईच्या न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत पोलिस अधिकारी रियाझ काझी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले.
- ११ एप्रिल रोजी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाजे यांचे सहकारी काझी यांना अटक केली.
- ५ मार्च रोजी ठाण्यात हिरणचा मृतदेह सापडला.
- या एसयूव्हीमधून स्फोटके बनवण्यासाठी वापरलेली सामग्री जप्त करण्यात आली.
- या प्रकरणाच्या तपासासंदर्भात वाझे यांना एनआयएने १३ मार्च रोजी अटक केली होती.
- तसेच तपास यंत्रणेने माजी पोलिस विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोरे यांनाही अटक केली.
- ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.