मुक्तपीठ टीम
आशियातील सर्वात श्रीमंत मनपा असलेली मुंबई मनपाच्या यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होत. दरम्यान मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर करण्या आला आहे. मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ४५ हजार ९४९ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. हा मनपाच्या इतिहासात हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. करोनाचे संकट असल्याने अर्थसंकल्प ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात १७.७० टक्क्याने वाढ
- मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज सकाळी सव्वा अकरा वाजता पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला.
- यंदाचा मनपाचा अर्थसंकल्प ४५ हजार ९४९ कोटींचा आहे.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात १७.७० टक्क्याने वाढ करण्यात आली आहे.
- गेल्या वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.
- मुंबई मनपाचा अर्थसंकल्प वाढला असला तरी
- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात येणा-या अर्थसंकल्पात विकासकामांवर भर दिला जाणार असून कोणताही कर नसलेला अर्थसंकल्प असेल असा अंदाज व्यक्त केला जात होता.
मनपाचे सर्वांसाठी पाणी हे नवे धोरण
- निवडणुकीच्या तोंडावर मनपाने सर्वांसाठी पाणी हे नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
- याआधी सत्ताधारी शिवसेनेनं मुंबईकरांना २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते.
- मात्र याचा केवळ प्रायोगिक प्रकल्प मुलुंड वांद्रे पश्चिममध्ये सुरु करण्यात आला.
- नंतर तो बंद पडला होता.
- मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
कचरा निर्मिती करणाऱ्यांना शुल्क भरावे लागणार…
- “वापरकर्ता शुल्क” अंतर्गत मनपाने अंदाजे १७४ कोटी रुपये इतक्या वार्षिक उत्पन्नाचे लक्ष्य ठरवले आहे.
- तसेच मुंबईत ३५०० हून अधिक उपहारगृहे आहेत जी प्रतिदिन जवळपास ३०० टन ओला कचरा निर्माण करतात.
- त्यातील बहुतांश कचरा सध्या मनपाद्वारे वाहून नेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते.
- वापरकर्ता शुल्काचा समावेश असलेल्या उपविधींचा मसुदा सध्या विचाराधीन आहे आणि सन २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून अधिसूचना प्रसारीत झाल्यानंतर उपविधी लागू होणे अपेक्षित आहे.
अनधिकृत बांधकांना दुप्पट दंड
- महापालिकेच्या तिजोरीला गळती लागल्याने महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मनपाने नवीन मार्ग अवलंबले आहेत.
- त्याचाच एक भाग म्हणून अनधिकृत बांधकामांना ज्यादा दंड आकरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- आता अनधिकृत बांधकाम आढळल्यास मालमत्ता कराच्या दोन पट दंड आकारणी करण्यात येणार आहे.
- उत्पन्नवाढीसाठी मुंबईत डिजीटल जाहिरातींच्या माध्यमांना परवानगी दिली जाणार आहे.
- यातून अतिरीक्त उत्पन्न मिळवण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र
- गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आरोग्यावर भरीव २६६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- आता आपल्या घराशेजारी आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे.
- मुंबईत २०० हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहेत.
- त्यासाठी एकूण ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मालमत्ता करापासून प्राप्त होणाऱ्या उत्पनाची स्थिती
- मालमत्ता करातून मिळणारं मनपाचं उत्पन्न ७००० कोटींवरुन ४८०० कोटी इतकं सुधारित करण्यात आलं आहे.
- ५०० चौरस फुटांखालील घरांना मालमत्ता करातून १०० % सूट देण्यात आली आहे.
- ही सूट मिळालेल्या नागरिकांची संख्या १६,१४,००० एवढी असून सवलतीची रक्कम ४६२ कोटी इतकी दाखवण्यात आली आहे.
- बेस्ट उपक्रमाला अर्थसहाय्यापोटी ८०० कोटी रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- तर गोरेगाव-मुलुंड लिंकरोड साठी १३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
२०० शिवयोग केंद्र आता मुंबईत
- शिवयोग केंद्र आता मुंबईत असणार आहे.
- केंद्राच्या या योजनेचं शिवसेनेने नामकरण करून ही योजना मुंबईत राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यानुषंगाने मुंबईत २०० शिवयोग केंद्र स्थापन केली जाणार आहेत.
- त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.