Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच! राज्य शिक्षण मंडळाची घोषणा!

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं
0
10 12 offline exams

मुक्तपीठ टीम

दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी गेल्या शनिवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत संबंधित माहिती दिली आहे.

 

दहावीची परीक्षा वेळापत्रकानुसार

  • दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे.
  • त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे.
  • तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्चदरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होईल .
  • अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे.

 

पेपर लिहिण्यासाठी अधिक वेळ

  • यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे.
  • ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे अतिरिक्त वेळ तर ७० गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.
  • दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावं लागणार आहे.
  • तसंच १० मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल.

 

ऑफलाईन परीक्षेसाठीची नियमावली

  • परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय अडचण आल्यास केंद्रावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.
  • कोरोनामुळे आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल.
  • जर एखाद्या विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान लक्षणं दिसली तर त्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल.
  • तसंच जवळच्या आरोग्य केंद्रामार्फेत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाईल.
  • परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुरवणी परिक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल.
  • जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते. तोंडी परीक्षाही दोन वेळेस देण्याची संधी असेल.
  • परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरणाचं बंधन नसेल.
  • मात्र, पालकांनी पाल्याचे लसीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे.
  • राज्यात दहावी आणि बारावीच्या ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्याचे लसीकरण झाल्याची माहिती आहे.
  • परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त २५ विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील.
  • विद्यार्थ्याच्या जवळचे परीक्षा केंद्र देण्याची सोय करण्यात येईल.
  • शाळेत अधिक विद्यार्थ्यी असल्याचं त्याच शाळेत परीक्षा केंद्र करण्यात येईल.

Tags: hscMaharashtraOfflineSharad gosavisscVrsha gaikwadशरद गोसावी
Previous Post

“२ कोटी रोजगाराच्या जुमल्यानंतर ६० लाख नोकऱ्यांचा नवा जुमला!” : सचिन सावंत

Next Post

मुंबई मनपाचा अर्थसंकल्प: सर्वांना पाणी! २०० नवी आरोग्य केंद्रं! अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अद्दल!!

Next Post
BMC BUDGET 2022

मुंबई मनपाचा अर्थसंकल्प: सर्वांना पाणी! २०० नवी आरोग्य केंद्रं! अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अद्दल!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!