मुक्तपीठ टीम
मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रोच्या मेट्रो २च्या दहिसर ते कांदिवली डहाणूकरवाडी आणि मेट्रो ७च्या या दोन मार्गांच्या दहिसर ते आरे टप्प्याचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या दिवशी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच रविवारपासून प्रवासी वाहतूक सेवा सुरू केली जाणार आहे. यामुळे दोन मार्गांशी जोडलेले प्रवासी मेट्रोमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.
आता दोन्ही मेट्रोंच्या पहिल्या टप्प्यांचे उद्घाटन
- पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर करून प्रवास वेगवान करण्यासाठी ‘मेट्रो २’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे.
- ‘मेट्रो २’ मार्गिकेअंतर्गत दहिसर ते डी. एन. नगर अशी ‘मेट्रो २ अ’ या मार्गिकेचे काम सुरु आहे.
- शनिवारी ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मधील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होईल.
- गुढीपाडव्याला ‘मेट्रो २ अ’ मार्गाच्या दहिसर ते कांदिवली डहाणूकरवाडी टप्प्याचे उद्घाटन आहे.
- दहिसर ते अंधेरी पूर्व अशी ‘मेट्रो ७’ मार्गाच्या दहिसर ते आरे या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होईल.
- रविवारपासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात होईल.
- मेट्रोमुळे पश्चिम उपनगरातील लिंक रोड, हायवेवरील वाहतूक कोंडी घटण्याची शक्यता आहे.
- त्यामुळे रस्ते प्रवासासाठीचा वेळही घटण्याची शक्यता आहे.
- उरलेले काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मार्गांवरील दहिसर ते अंधेरी या टप्प्यातील वाहतूक सुरु केली जाण्याची शक्यता आहे.
Get ready to experience travel comfort comparable to International Cities right in Mumbai!From 2nd April onwards Metro line 2A & 7 wl be operational for public commute #MumbaiMetro2022 #HaPadwaGoodyPadwa @CMOMaharashtra @mieknathshinde @MahaDGIPR @MMMOCL_Official @MumbaiMetro3 pic.twitter.com/oLnZ3lD7kr
— MMRDA (@MMRDAOfficial) March 31, 2022
रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून गारेगार मेट्रोनं प्रवास करा!
- प्रवासी वाहतुकीला सुरुवात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
- मात्र शनिवारी संध्याकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम आहे.
- त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर तात्काळ सेवा सुरू करणे शक्य नाही.
- त्यामुळे रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून दहिसर ते कांदिवली डहाणूकरवाडी आणि दहिसर ते आरे मार्गावर मेट्रो सेवा सुरू होईल.
- सध्या पहिल्या टप्प्यासाठी ११ गाड्या असून वर्षभरात आणखी २० गाड्यांची भर पडेल.
नव्या मेट्रोचे नवे तिकीट दर किती?
- पहिल्या टप्प्यासाठी १०, २०, ३०, ४० आणि ५० रुपये असे तिकीट दर असणार आहेत.
- सध्या पासची सुविधा उपलब्ध नसली तरी लवकरात लवकर पासची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे श्रीनिवास यांनी या वेळी सांगितले.
- तसेच शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात सवलत देण्यात येणार आहे.
- ही सवलत नेमकी कशी असेल आणि ती कधी लागू होईल हे लवकरच जाहीर केले जाईल.