मुक्तपीठ टीम
देशभर पसरलेल्या कोरोना साथीच्या रोगाचं प्रमाण आता घटताना दिसत आहे. राज्यात ५० हजार कोरोनामुळे मृत्यूचा गंभीर टप्पा ओलांडल्यानंतर, आता महाराष्ट्रात गेल्या सहा दिवसांतील सर्वात कमी कोरोना मृत्यूचा आकडा ३४ वर आला आहे. आजवरची ही सर्वात कमी मृत्यूसंख्या आहे.
मुंबईतही मृत्यूचा आकडा आता एक आकडी उरला आहे. त्यामुळे कोरोनाविषयी जुळलेली भीती कमी होताना दिसत आहे. ८ जानेवारी वगळता ३१ डिसेंबरपासून शहरात एक आकडी मृत्यूदर दिसत आहे. राज्यातील मृत्यूची संख्या घटून २.५४% झाली आहे, तर मुंबईत संध्या ३.७४% आहे.
रविवारी राज्यात ३,५५८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, त्यांची एकूण संख्या १९,६९,११४ इतकी आहे. शनिवारी मुंबईतही ६५७ प्रकरणे नोंदवली गेली. शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ लाखांच्या जवळ पोहोचले आहे.
राज्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत यूकेहून परत आलेल्या ४,८६९ नागरिकांचा शोध घेण्यात आला असून, त्यापैकी ३,५०६ जणांनी आरटी-पीसीआर चाचणी घेतल्या आहेत आणि ७५ लोकांच्या कोरोना टेस्ट पॅाझिटिव्ह आल्या आहेत. यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे पाठविले गेले आहेत, असे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.
मुंबई मनपाचे सुरेश काकाणी म्हणाले की, लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी महानगर सज्ज आहे. अखिल भारतीय लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
पाहा व्हिडीओ: