मुक्तपीठ टीम
रविवारी रेल्वेने बाहेर फिरायला जायचा प्लान करत आहात? तर जरा ही बातमी वाचा. मुंबईकरांसाठी रविवारी रेल्वेने प्रवास करणं हे डोकेदुखी ठरू शकते. कारण मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेने भायखळा ते माटुंगा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान तर पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते कांदिवली दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत लोकल विलंबाने धावणार आहेत तर काही लोकलफेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत.
कुठे आणि कधी आहे मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वे
बोरिवली ते कांदिवली
- रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत ब्लॉक असणार आहे.
- ब्लॉक काळात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावरून धावणार आहेत.
- यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे-
भायखळा ते माटुंगा
- रविवारी सकाळी १२ वाजून ४० मिनिटांनी ते सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.
- तसेच शनिवार रात्री ११ ते रविवारी पहाटे ४.३० पर्यंत रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल.
- ब्लॉकच्या वेळेत जलद मार्गावरील लोकलफेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
- यामुळे काही लोकलफेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे
- रविवारी सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई/वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणाऱ्या अप आणि डाऊन लोकलफेऱ्या रद्द राहणार आहे.
- गोरेगाव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील.
पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल २० मिनिटांच्या फरकाने धावतील.