Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान शिवसेनेलाच! शिंदे गटाला मोठा धक्का!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shivsena dasara melava

मुक्तपीठ टीम

मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कचं मैदान दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेलाच मिळणार आहे. उच्च न्यायालयाने बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला परवानगी देण्याची मागणी न्यायालयाने स्वीकारली आहे. मुंबई पोलिसांच्या हवाल्याने मनपाने कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत कोणालाही परवानगी नाकारल्याचा दावा मनपाने केला होता.

पंरपरा दसरा मेळाव्याची…

  • शिवसेना म्हटलं की दसऱ्याला होणारा मेळावा, हे समीकरण ठरलेलं आहे.
  • कोरोना संकटासारखी वर्षे सोडली, तर दरवर्षी दसऱ्याला शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो.
  • या मेळाव्यात आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असे पर्यंत ते आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संबोधित करत असतात.
  • या मेळाव्यात ठाकरेंकडून शिवसैनिकांना जणू पुढील एक वर्षासाठीचा प्रेरणादायी वैचारिक अजेंडा मांडला जातो.

shisena

शिंदेंच्या बंडांनंतर प्रथमच मेळाव्यासमोर संकट

  • यावर्षी २० जूनच्या रात्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बंडानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेशी संबंधिक सर्वच बाबींवर दावा सांगण्याची सुरुवात झाली.
  • सर्वोच्च न्यायालयात, निवडणूक आयोगात पक्षावरून सुरु असलेल्या कायदेशीर लढाईप्रमाणेच आधी शिवसेनाभवन आणि आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर हक्क सांगण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न झाला.
  • त्यातील शिवसेनाभवन हे एका विश्वस्त संस्थेच्या नावावर असल्यानं तिथं काहीच शक्य झालं नाही.
  • त्यानंतर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने अर्ज केल्यानंतर आमदार सदा सरवणकरांनी आठवडाभरानं मेळाव्यासाठी अर्ज केला.
  • मुंबई मनपानं पोलिसांच्या कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्याकडे बोट दाखवत, शिवसेना आणि शिंदे गटाला परवानगी नाकारली.

दसरा मेळाव्यासाठी कायदेशीर लढाई!

  • शिवसेनेनं त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, तर शिंदे गटाकडून हस्तक्षेप याचिका करण्यात आली.
  • शिंदे गटानं केलेली याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली.

मुंबई मनपाची काय भूमिका?

  • मुंबई मनपाच्या विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय हा मेळाव्यासाठी मैदान देण्याविरोधात होता.
  • खरी शिवसेना कोणाची? हा निर्णय सध्या न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे शिवसेना किंवा शिंदे गट या पैकी कुणालाही परवानगी देऊ नये, असा विधी विभागाचा अभिप्राय होता.
  • आज न्यायालयात मनपाने पोलिसांचा हवाला देत कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याचं कारण देत परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले.

Tags: BMCDasara Melavamumbai high courtShinde GroupShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेदसरा मेळावामुंबई उच्च न्यायालयमुंबई महापालिकाशिंदे गटशिवसेना
Previous Post

रुपया घसरतोय! समजून घ्या आपल्या जीवनावर कसा होतो दुष्परिणाम…

Next Post

बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात भारताने साध्य केला महत्वपूर्ण टप्पा

Next Post
Child Death

बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात भारताने साध्य केला महत्वपूर्ण टप्पा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!