Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘कोरोना दरम्यान राजकीय गर्दी रोखा!’

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mumbai hc

मुक्तपीठ टीम

नवी मुंबई विमानतळ नामकरण मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी जमवणाऱ्या मोठ्या कार्यक्रमांवर बंदी असूनही नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाला राज्य सरकारनं कशी परवानगी दिली? असा सवाल केला. तुम्हाला हे जमत नसेल, तर आम्हाला सांगा, असंही न्यायालयानं राज्य सरकारला बजावलं आहे.

 

“कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणार्‍या कोणत्याही राजकीय सभा आणि कार्यक्रमांना रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्याकडे असणाऱ्या सर्व यंत्रणांना कार्यरत करावे,” असे उच्च न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना सांगितले.

 

उच्च न्यायालयाने म्हटले की, ‘राज्यात लागू असलेले नियम आणि कायदे यांची अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारला जर ही जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर आम्हाला सांगा. मग पुढे काय करायचं ते आम्ही बघू, असा इशारा मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्या. जी.एस. कुलकर्णी यांच्या पीठानं सरकारला दिला.

नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव द्यायचं? यावरून वाद सुरु आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांकडून जोर धरत आहे, तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होतं आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली २४ जून रोजी हजारोंच्या गर्दीचं आंदोलन झालं होतं.

 

नवी मुंबईत कशासाठी झाले होते आंदोलन

  • नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नाव देण्यासाठी भाजापचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने संघर्ष सुरु आहे.
  • विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक आग्रही आहेत.
  • अनेक संस्था, संघटनांनी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतच्या मागण्यांची निवेदने सिडको, राज्य सरकारकडे दिलेले आहेत.
  • काही महिन्यांपूर्वी शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर सिडको संचालक मंडळाने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सरकारकडे पाठवल्यानंतर हा वाद निर्माण झाला.

Tags: coronamumbai high courtstate governmentकोरोनानवी मुंबई विमानतळमुंबई उच्च न्यायालयराज्य सरकार
Previous Post

अमरावतीत अंगणवाडी सेविका म्हणून सेवाकार्याची संधी

Next Post

“कर्मयोगी: दुसऱ्यासाठी कर्म करणारा”

Next Post
adhyatm

"कर्मयोगी: दुसऱ्यासाठी कर्म करणारा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!