मुक्तपीठ टीम
मुंबई फर्स्ट या सार्वजनिक धोरण थिंक टँक आणि ना- नफा तत्वावर काम करणाऱ्या कंपनीतर्फे चालू महिन्यात दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरांसाठी हवामानाशी संबंधित वेगाने वाढत असलेल्या संकटांदरम्यान मार्ग काढण्यासाठी हवामान सांख्यिकी एकत्रित करण्याच्या आवश्यकतेचे परीक्षण केले जाईल.
‘क्लायमेट क्रायसिस 2.0: मोबिलाइझिंग फायनान्स फॉर कोस्टल सिटीज’ या बॅनरअंतर्गत, महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा आणि द युरोपियन युनियन, कॉन्सुलेट ऑफ नेदरलँड्स अँड मॅकिंन्से यांच्यासारख्या नॉलेज पार्टनर्सच्या मदतीने १२ व १३ मे रोजी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये विविध प्रकारच्या समस्यांचे परीक्षण आणि त्यावर चर्चा केली जाणार असून त्यामध्ये हवामानाशी संबंधित जोखीम आणि किनारपट्टीवरील शहरांना असलेल्या धोक्यांपासून मुंबईसारख्या शहरांत हवामानानुसार लवचिक पायाभूत सुविधांसाठी निधी उभारणी करण्यापर्यंतच्या समस्यांचा समावेश असेल.
या दोन दिवसीय बैठकीमध्ये मुंबई आणि एमएमआरसारख्या (मुंबई मेट्रोपोलिटन रिजन) येत्या दशकभरात बदलाच्या छायेखाली असलेल्या हवामानासाठी वित्त एकत्रित करणे किती महत्त्वाचे आहे याविषयी हेतुपूर्ण चर्चा केली जाणार आहे. त्याशिवाय या बैठकीद्वारे राज्य आणि मनपा सरकारमध्ये खासगी क्षेत्रासह भागिदारी करण्यासाठी व्यासपीठ पुरवले जाणार असून त्याअंतर्गत हवामान बदलाचा धोका कमी करण्यासाठी व अनुकूलता निर्माण करण्यासाठी हरित गुंतवणुकीच्या संधींचा शोध घेतला जाईल.
या बैठकीमध्ये वरिष्ठ सरकारी अधिकारी, महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योजक, राजकारणी, शहर नियोजक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक आणि पर्यावरण शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी उपस्थित राहाणार आहेत.
मान्यवरांमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश असेल
- ईयूचे भारतातील राजदूत श्री. उगो अस्तुटो
- अशोक लवासा, उपाध्यक्ष, खासगी क्षेत्र आणि पीपीई, एशियन डेव्हलपमेंट बँक
- डॉ. अतुल बगाई, भारत प्रमुख, युनायटेड नेशन्स एन्व्हॉरमेंट प्रोग्रॅम (युएनईपी)
- वेंडी वेर्नर, भारत देश प्रमुख, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन
- रिचर्ड दमानिया, प्रमुख अर्थतज्ज्ञ, सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रॅक्टिस ग्रुप, द वर्ल्ड बँक ग्रुप
- नैना फेन्टन, प्रमुख – प्रादेशिक प्रतिनिधीत्व, दक्षिण आशिया, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक
- प्रियांका चतुर्वेदी, खासदार, राज्य सभा
मुंबई फर्स्टचे अध्यक्ष नरिंदर नायर म्हणाले, ‘महामारीनंतरच्या जगात शहरी हवामान बदलांच्या समस्या हाताळणे व त्यांचे निराकरण करणे आणखी आवश्यक झाले आहे. ‘हवामान कृती योजना’ तयार करणारे मुंबई हे नुकतेच पहिले भारतीय शहर ठरले असून या योजनेमध्ये हवामान बदलांच्या धोक्यांचा विचार करून उत्सर्जन कपातीविषयी स्पष्ट आणि पॅरीस कराराशी सुसंगत ध्येये मुंबईसाठी आखण्यात आली आहेत. ही योजना सुरुवात असून आता आपल्याला प्रस्तावित प्रकल्प आणि योजनांवर कार्यवाही करण्यासाठी खासगी क्षेत्र तसेच जागतिक हवामान वित्तपुरवठा संस्थांशी हेतुपूर्ण भागिदारी करण्याची गरज आहे. या बैठकीमध्ये शमन योजना आणि मुंबई व पाण्याजवळची इतर उष्णकटीबंधातील शहरांत हवामानानुसार लवचिक पायाभूत सुविधा उभारून समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीला कसे तोंड द्यायचे याविषयी चर्चा सुरू करण्याची आशा मुंबई फर्स्टला आहे.’
फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या अशाच प्रकारच्या हवामानविषयक बैठकीनंतर या बैठकीमध्ये पृथ्वीची यंत्रणा नाजूक समतोल, एकमेकांशी जोडलेली रचना स्थापन करत असल्याने तापमानातील वाढ ही कशी केवळ एक सुरुवात आहे यावरही प्रकाश टाकला जाईल.
या बैठकीमध्ये जपान, नेदरलँड्स, श्री लंका आणि सिंगापूरचे कौन्सुल जनरल हवामान शमन आणि अवलंब धोरणाविषयी संबोधित करतील. या कार्यक्रमात ग्लोबल कॉव्हेनंट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट अँड एनर्जी (जीसीओएम) – ११,५०० शहरे व स्थानिक सरकारांच्या बांधिलकीवर उभारण्यात आलेले शहरी हवामान नेतृत्वाचे सर्वात मोठे जागतिक सहकार्य, यांच्यासाठीच्या ईयू फंडेड प्रकल्पाचे लाँच केले जाईल. दोन दिवसांतील विविध सत्रांदरम्यान वादाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांचे परीक्षण केले जाणार असून त्यात पर्यावरण प्रशासन, धोरण मध्यस्थी, तंत्रज्ञानातील नाविन्य आणि हरित वित्त पुरवठा यांचा समावेश असेल.
सहकार्याने जेएसडब्ल्यू फाउंडेशन, ब्लू डार्ट, कॉनकास्ट इंडिया हे या बैठकीचे सह- प्रायोजक आणि एचएचबीसी, कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कं. लि., ऑल कार्गो लॉजिस्टिक्स आणि आयसीसीएसए हे या बैठकीचे पुरस्कर्ते आहेत.
About Mumbai First
Mumbai First, formerly Bombay First, acts as a powerful think tank to influence policy-making in positive ways and is committed to the re-generation of Mumbai’s economic and social infrastructure, in order to make it a globally competitive and a truly World Class City. Mumbai First plays the role of a critical catalyst and an able partner to the Government, private sector and civil society at large.
Key projects like Mumbai Metro, the Trans-harbor Link which are set to transform MMR were conceptualized and advocated by Mumbai First. Over the years, we have also conducted key conferences like the BRICS Conference (2016), Metamorphosis (2009), Security and Resilience Conference (2009), Climate Crisis: Action for Tropical Coastal Cities (2020), and more. The initiatives of Mumbai First also had the support of the Prime Minister’s Office, World Bank, and the European Union, amongst others. With McKinsey as the knowledge partners, Mumbai First initiated a study for the corporates such as The Tatas, Mahindras, Godrej, Reliance, amongst others. The report led to a very close public-private partnership with the State Government and formed the basis of the “Vision Mumbai” document prepared for the Government of Maharashtra and several infrastructure projects that are now being implemented are part of this report.