Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नैना प्रकल्पाच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीस वेग, सूचना व हरकती नोंदविण्याचे सिडकोचे आवाहन

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Naina Project

मुक्तपीठ टीम

नैना प्रकल्पाकरिता विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नैना प्रकल्पातील २३ गावांच्या मंजूर करण्यात आलेल्या अंतरिम विकास आराखड्याची अंमलबजावणी सिडकोतर्फे करण्यात येत आहे. त्यानुसार प्रारुप नगर रचना परियोजना क्र. ४, ५, ६ आणि ७ तयार करण्याचा इरादा महाराष्ट्र शासन राजपत्रासोबतच स्थानिक वर्तमानपत्रांतदेखील जाहीर करण्यात आला होता. सदर प्रारुप योजनांविषयी काही सूचना व हरकती असल्यास, जमीन मालकांनी सिडकोच्या नैना कार्यालयात सादर करण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत
आहे.

या प्रस्तावाचा भाग म्हणून प्रारुप नगर रचना परियोजना क्र. १,२ आणि ३ ला शासनाने मंजुरी दिली आहे. प्रारुप नगर रचना परियोजना क्र. ४,५,६ आणि ७ तयार करण्याचा इरादा अनुक्रमे दिनांक २१ जून २०१९, २६ जून २०१९, ८ ऑगस्ट २०१९ व १८ सप्टेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आला होता. सदर योजना प्रसिद्ध करण्यासंबंधीची सूचना दि. २५ एप्रिल २०२२ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रांमध्येही याबाबतची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परियोजनांचे सविस्तर नकाशे, अहवाल आणि नियमावली फॉर्म क्र. १ व २ जमीन मालकांना पाहण्याकरिता नैना कार्यालय, ७वा मजला, टॉवर क्र. १०, सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानक संकुल तसेच सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सिडकोच्या संकेतस्थळावर परियोजनांचा तपशील हा पुढील अनुक्रमांकां (अ.क्र.) पुढे उपलब्ध आहे.

  • प्रारुप परीयोजना क्रमांक—४ सिडकोच्या संकेत स्थळावरील नैना येथील मराठी अनुक्रमांक ९१ वर असून इंग्रजी अनुक्रमांक ९३ वर उपलब्ध आहे.
  • प्रारुप परीयोजना क्रमांक—५ सिडकोच्या संकेत स्थळावरील नैना येथील मराठी अनुक्रमांक ९२ वर असून इंग्रजी अनुक्रमांक ९४ वर उपलब्ध आहे.
  • प्रारुप परीयोजना क्रमांक—६ सिडकोच्या संकेत स्थळावरील नैना येथील मराठी अनुक्रमांक ९३ वर असून इंग्रजी अनुक्रमांक ९५ वर उपलब्ध आहे. प्रारुप परीयोजना क्रमांक—७ सिडकोच्या संकेत स्थळावरील नैना येथील मराठी अनुक्रमांक ९४ वर असून

इंग्रजी अनुक्रमांक ९६ वर उपलब्ध आहे. सदर सुचना स्थानिक वृत्तपत्रात सुध्दा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

तरी संबंधित जमीन मालकांनी मूळ जमिनीचा आकार व त्यांना देऊ करण्यात आलेले अंतिम भूखंडाचे क्षेत्र यांमध्ये काही तफावत आढळल्यास, तसेच उपरोक्त प्रारुप योजनांविषयी काही सूचना व हरकती असल्यास, प्रारुप योजना प्रसिद्ध करण्यासंबंधीची सूचना वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सिडकोच्या नैना कार्यालयात ७/१२ आणि गटबुकासह सादर कराव्यात, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. ग्राह्य सूचनांच्या अनुषंगाने उपरोक्त प्रारुप परियोजना राज्य शासनाच्या मंजुरीस्तव सादर करण्यात येणार आहेत.


Tags: appeal of CIDCOdevelopment planGovernment of Maharashtramuktpeethnaina projectnavi mumbaispeed of implementationअंमलबजावणीस वेगचांगली बातमीनवी मुंबईनैना प्रकल्पमहाराष्ट्र शासनमुक्तपीठविकास आराखडासिडकोसिडको आवाहन
Previous Post

मुंबई फर्स्टतर्फे हवामान बदलांवर आधारित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बैठकीचे आयोजन

Next Post

प्रदूषणमुक्त डिलिव्हरीसाठी ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’चा पुढाकार, ई-वाहनांसाठी ‘टेरागो लॉजिस्टिक्स’शी भागीदारी

Next Post
Mahindra Electric

प्रदूषणमुक्त डिलिव्हरीसाठी ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’चा पुढाकार, ई-वाहनांसाठी ‘टेरागो लॉजिस्टिक्स’शी भागीदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!