Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home कायदा-पोलीस

मुंबईच्या डोंगरीत ड्रग्जचा कारखाना, ‘डी कंपनी’चा परवेज खान मालक

ड्रग्जप्रकरणी एनसीबीची चालू वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई

January 23, 2021
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0

  • कारखान्याचा मालक कारवाईपूर्वीच फरार; एलओसी जारी करणार

  • २ कोटी १८ लाख रुपयांसह ड्रग्ज, दोन रिव्हॉल्व्हर व इतर साहित्य जप्त

मुक्तपीठ टीम

ड्रग्जप्रकरणी नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी चालू वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई केली आहे. डोंगरी परिसरात सुरु असलेल्या एका ड्रग्ज बनविणार्‍या कारखान्याचा एनसीबीने पर्दाफाश केला, कारखान्याचा मालक आणि करीमलालाचा नातेवाईक आणि दाऊदचा खास सहकारी परवेज खान ऊर्फ चिंकू पठाण याचा खास सहकारी आरिफ भुजवाला हा कारवाईपूर्वीच पळून गेला आहे, तो विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याने त्याच्याविरुद्ध देशभरातील सर्वच आंतरराष्ट्रीय विमानतळावर लुक आऊट नोटीस जारी करण्यात येणार आहे.

रोकड, रिव्हॉल्व्हर जप्त

दरम्यान याच गुन्ह्यांत अटकेत असलेल्या आरोपींना नवी मुंबईतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने आरोपींना एनसीबी कोठडी सुनावली आहे. या कारवाईत या अधिकार्‍यांनी कोट्यवधी रुपयांचे बारा किलो ड्रग्ज, दोन रिव्हॉल्व्हर, २ कोटी १८ लाख रुपयांची कॅश आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. सिनेअभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचा तपास करताना बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणाचा पर्दाफाश झाला होता, त्यामुळे एनसीबीने स्वतंत्र गुन्हे दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती, तपासादरम्यान या अधिकार्‍यांनी एकापाठोपाठ एक ड्रग्जच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आरोपींची नावे समजली होती, या सर्वांवर नंतर एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती.

परवेज दाऊद इब्राहिमचा खास

त्यातच गेल्या काही दिवसांत ड्रग्ज तस्काराविरुद्ध एनसीबीने धडक मोहीम सुरु केली होती, ही कारवाई सुरु असतानाच या अधिकार्‍यांनी जे. जे मार्ग परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना अटक केली होती, या दोघांकडून काही प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, त्यांच्या चौकशीत परवेज खान याचे नाव समोर आले होते, परवेज हा करीमलालाचा नातेवाईक आणि दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध एनडीपीएससह इतर काही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी तडीपार केले होते.

ड्रग्जची कमाई मुंबईत, हवाला दुबईत!

परवेज हा मुंबईबाहेर राहूनच दक्षिण मुंबईत ड्रग्जचे एक मोठे रॅकेट चालवित असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्याचे सर्व व्यवहार सध्या नवी मुंबईतील घणसोली परिसरातून चालत असल्याने एनसीबीच्या एका विशेष पथकाने दोन दिवसांपूर्वी घणसोली परिसरातील एका फ्लॅटमध्ये छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान परवेजसह झाकीर हुसैन फझल शेख या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांकडून पोलिसांनी ५२ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, काही कॅश आणि एक पिस्तूल जप्त केले होते. तपासात परवेज हा दाऊदचा अत्यंत खास आणि जवळचा सहकारी म्हणून गुन्हेगारी जगतात परिचित आहे, तो दाऊद टोळीसाठी ड्रग्ज तस्करीचे सर्व व्यवहार सांभाळत होता, त्यातून येणारी रक्कम तो हवालामार्फत दुबई येथे पाठवित होता. तडीपार केल्यांनतर त्याने नवी मुंबईत स्वत:चे बस्तान बसविले होते. तेथून तो त्याच्या टोळीचे सूत्र हलवित होता. परवेज हा राज्यातील एक मोठा ड्रग्ज सप्लायर म्हणून ओळखला जातो.

कोणत्याही ड्रग्जसाठी एकच नाव…परवेज!

त्याच्याकडे कुठल्याही ड्रग्जची मागणी करा, ते ड्रग्ज संबंधित व्यक्तींना काही तासात मिळणार अशी ओळख परवेजची होती. गेल्या दोन दिवसांपासून एनसीबी कार्यालयात परवेजच्या चौकशी सुरु होती, या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक गोष्टींचा पर्दाफाश केला होता. त्याच्याच चौकशीत आरिफ भुजवाला याचे नाव समोर आले होते. आरिफ हा त्याचा खास सहकारी असून तो डोंगरीतील नूर मंझिल इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे छापा टाकला होता. मात्र एनसीबीची कारवाई होण्यापूर्वीच आरिफ हा तेथून पळून गेला होता, त्याला परवेजच्या अटकेची माहिती त्याच्या सहकार्‍यांकडून मिळाली होती, त्याच्या नूर मंझिल इमारतीच्या चवथ्या मजल्यावर या अधिकार्‍यांना ड्रग्ज बनविण्याचा एक कारखानाच सापडला. गेल्या पाच वर्षांपासून तिथे ड्रग्ज बनविले जात होते, तेथील लॅब पाहिल्यानंतर एनसीबीच्या अधिकार्‍यांनाही धक्का बसला होता. या लॅबमधून या अधिकार्‍यांनी बारा किलो ड्रग्जसह काही केमिकल्स हस्तगत केले होते, त्यानंतर आरिफच्या घरी या अधिकार्‍यांनी छापा टाकला होता, या छाप्यात या अधिकार्‍यांना २ कोटी १८ लाख रुपये आणि एक रिव्हॉल्व्हर सापडले. कारवाईदरम्यान या अधिकार्‍यांना काही महागड्या कारच्या चाव्या सापडल्या. जप्त केलेले रिव्हॉल्व्हर नंतर फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले होते.

ड्रग्ज प्रकरणाचे दुबई कनेक्शन

तपासात आरिफ आणि परवेज हे दोघेही दक्षिण मुंबईत ड्रग्जचे नेटवर्क चालवित होते, त्यांचे कनेक्शन दुबईशी असल्याचे उघडकीस आले असून खाण्यापिण्याच्या सामानातून त्यांची ड्रग्जची तस्करी सुरु होती. पठाण टोळीकडून अशा प्रकारे ड्रग्जची पूर्वी तस्करी केली जात होती. घटनास्थळी पोलिसांना एक डायरी सापडली असून त्यात ड्रग्जशी संबंधित व्यक्तींचे नाव, त्यांना देण्यात आलेले ड्रग्ज, आर्थिक व्यवहाराचा संदर्भ असल्याचे सांगण्यात आले. परवेज स्वतची प्रचंड काळजी घेत होता, ओळख नसलेल्या व्यक्तींना भेटणे तो नेहमीच टाळत होता, कारवाईसाठी बचाव करण्यासाठी त्याने घरातच सीसीटिव्ही कॅमेरे आणि वायमेट्री

क यंत्रणा बसविली होती, त्यातून तो तिथे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवून होता. ड्रग्जमधून येणारा पैसा तो हवालामार्फत दुबईत पाठवित होता, दुबईत त्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केल्याचे बोलले जाते.

ड्रग्ज रॅकेटच्या चौकशीत रॅपरचे नाव

परवेजच्या चौकशीत डी जे रॅपर रोहितचे नाव समोर आले होते, तो भिवंडी येथे राहत असल्याने त्याच्या अटकेसाठी एनसीबीचे एक पथक तिथे रवाना झाले आहे. रोहित हा काही वर्षांपासून परवेजच्या संपर्कात होता, तसेच त्याच्यासाठी एमडी ड्रग्जची विक्री करीत होता. दुसरीकडे या कारवाईपूर्वी आरिफ पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी एनसीबीने विशेष मोहीम सुरु केली आहे. तो विदेशात पळून जाऊ नये म्हणून लवकरच त्याच्याविरुद्ध एलओसी जारी करण्यात येणार आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आले होते, त्यांचा शोध सुरु आहे, त्यांच्या अटकेने ड्रग्जप्रकरणातील एका मोठ्या टोळीवर कारवाई करण्यात एनसीबीला यश येणार आहे, आरोपींच्या चौकशीतून इतर काही माहिती प्राप्त होत असून या माहितीनंतर एनसीबीचे पथक विविध ठिकाणी पाठविले जात आहे, लवकरच त्यांच्या इतर सहकार्‍यांना या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे सांगण्यात आले.


Tags: D companyDawood IbrahimDrug racketNCBएनसीबीडी कंपनीड्रग्ज रॅकेटदाऊद इब्राहिमदुबई
Previous Post

अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भोकरमध्ये १९४ कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन

Next Post

#चांगलीबातमी तिकिट तपासणीसांचा प्रामाणिकपणा, २५ हजार असलेले पाकीट परत

Next Post
TC

#चांगलीबातमी तिकिट तपासणीसांचा प्रामाणिकपणा, २५ हजार असलेले पाकीट परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!