Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई – देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रा, ६७ वर्षीय ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञांचं नेतृत्व!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
पर्यावरण जागृती सायकल यात्रा

मुक्तपीठ टीम

‘प्रगतीकडून पर्यावरण रक्षणाकडे’ (‘प्रगति से प्रकृति तक’) या मुंबई ते देहरादून पर्यावरण जागृती सायकल यात्रेचा शुभारंभ झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी राजभवन मुंबई येथून झेंडा दाखवून रवाना केले. ६७ वर्षीय ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि हिमालय पर्यावरण अध्ययन व संवर्धन संस्थेचे संस्थापक डॉ अनिल प्रकाश जोशी या सायकल यात्रेचे नेतृत्व करीत आहे. राज्यपालांच्या हस्ते रॅलीच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले, तसेच सहभागी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

सायकल यात्रेच्या आरंभ प्रसंगी अभिनेत्री हिमानी शिवपुरी, अभिनेते हेमंत पांडे, इंडियन आयडॉल विजेते गायक पवनदीप राजन, उद्योजक अनंत सिंघानिया, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ अब्राहम मथाई आदी उपस्थित होते.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते आज जग ज्वालामुखीवर उभे आहे. भारतीय तत्वज्ञानात निसर्गाच्या पाच तत्वांचा समतोल साधण्यावर भर दिला आहे. प्रत्येक शांतीमंत्रांमध्ये पृथ्वी, वनस्पती इत्यादी तत्वांच्या शांतीचा विचार मांडला आहे. विकास साधताना पर्यावरणाचा समतोल साधला गेल्यास शाश्वत विकास साधता येईल असे राज्यपालांनी सांगितले. पर्यावरण तज्ज्ञ डॉ अनिल जोशी यांची यात्रा समुद्राकडून हिमालयाकडे अशी उन्नत मार्गाने जाणार असून त्यातून जनजागृती होईल अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

‘प्रगतीकडून पर्यावरणाकडे’ या सायकल यात्रेचा आरंभ देशातील सर्वात प्रगतिशील शहर असलेल्या मुंबई येथे होत असून देशाची पर्यावरण राजधानी असलेल्या उत्तराखंड येथे तिचा समारोप होणार आहे, असे डॉ अनिल जोशी यांनी सांगितले. दरवर्षी जगात नवनवी विध्वंसक वादळे निर्माण होत आहेत. मनुष्याला विकास हवा आहे, रस्ते देखील हवे आहेत. अश्यावेळी विकास साधताना पर्यावरणाकडे नव्या दृष्टीने पाहावे लागेल असे डॉ अनिल जोशी यांनी सांगितले.

कोरोनासारख्या जागतिक आपत्तीच्या मुळाशी कोठेतरी निसर्गाप्रती माणसाचे चुकीचे वर्तन कारणीभूत आहे असे त्यांनी सांगितले. भावी पिढ्यांसाठी आपण घरे बांधीत आहोत, आर्थिक तरतूद करीत आहोत, परंतु मूलभूत गरजा असलेल्या पाणी, जमीन, हवा, जंगल याचा विचार करीत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतात पृथ्वी, जल, अग्नी यांची पूजा केली जाते त्यामुळे भारतच जगाला पर्यावरण रक्षणाचा विचार देऊ शकतो असे त्यांनी सांगितले. सकल घरगुती उत्पन्न (GDP) या ऐवजी सकल पर्यावरण उत्पन्न (GEP) या माध्यमातून विकास मोजला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सायकल यात्रेमध्ये 15 युवक युवती सहभागी झाले असून ही यात्रा ४० दिवसांमध्ये दहा हजार लोकांशी संपर्क साधेल व एक कोटी लोकांना निसर्ग रक्षणाचा संदेश देत २००० किमी अंतर पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

पाहा:


Tags: Environmental Awareness Cycle YatraEnvironmental Expertgood newsGovernor Bhagatsinh KoshyariInstitute of Himalayan Environmental Studies and ConservationmuktpeethMumbai - Dehradunघडलं-बिघडलंचांगली बातमीपर्यावरण जागृती सायकल यात्रापर्यावरण तज्ज्ञमुक्तपीठमुंबई - देहरादूनराज्यपाल भगतसिंह कोश्यारीहिमालय पर्यावरण अध्ययन व संवर्धन संस्था
Previous Post

नवरात्रोत्सवाचा उत्साह आता शिगेला, जालन्याचा दुर्गादेवी आणि सरस्वती माता मंदिरात भक्तीचा जल्लोष!

Next Post

आता वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक, एफडीएने जारी केला आदेश

Next Post
Medical Device Licensing

आता वैद्यकीय उपकरणांना परवाना बंधनकारक, एफडीएने जारी केला आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!