Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई सीमा शुल्क विभागाने जप्त केलेले ५३८ कोटी रूपयांचे अमंली पदार्थ केले नष्ट

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mumbai Customs destructs seized drugs worth Rs. 538 crores in illicit market

मुक्तपीठ टीम

मुंबई सीमा शुल्क विभाग -३ च्या वतीने आज नवी मुंबईतील तळोजा येथे असलेल्या मेसर्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (एमडब्‍ल्‍यूएमएल) च्या ज्वलन सुविधास्‍थानी १४०.५७ किलोंचे अंमली पदार्थ नष्ट करण्‍यात आले. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ५३८ कोटी रूपये आहे.

या संदर्भात जप्त करण्‍यात आलेल्‍या अंमली पदार्थांचा तपशील देताना, विभाग-३ चे मुख्‍य आयुक्त, राजेश सानन यांनी सांगितले की, नष्ट केलेली औषधे विभाग -३ अंतर्गत कार्यरत असलेल्‍या तीन आयुक्तालयांनी जप्त केली आहेत. जप्तीच्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

  • मुंबई विमानतळ आयुक्तालयाने १४ प्रकरणांमध्ये ५६.०६ किलो हेरॉईन आणि ३३.८१ किलो चरस जप्त केला आहे.
  • एअर कार्गो निर्यात आयुक्तालयाकडे दाखल केलेल्या गुन्ह्यात २१.७० किलो चरस जप्त केले.
  • डीआरआयने एका प्रकरणात २९ किलो हेरॉईन जप्त केले, तर मुंबई सीमा शुल्क विभाग-३ च्या प्रतिबंधात्मक आयुक्तालयाने हा माल नष्‍ट केला.

सीमाशुल्क कायदा,१९६२ च्या तरतुदींनुसार बंदी असलेले अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक म्हणजेच मनावर परिणाम करणारे पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्ती अवैध कृत्य करीत असल्याचे मानले जाते. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, १९८५ च्या कलम ८ अन्वये गुन्ह्यानुसार दोषी आहेत. तसेच या कायद्यातील कलम २१, कलम २३ आणि एनडीपीएस अधिनियम १९८५ मधील कलम २९ नुसार शिक्षेस पात्र आहेत.

सीमा शुल्क अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अंमली पदार्थ जप्तीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की; अंमल पदार्थांची तस्करी प्रामुख्याने केनिया, युगांडा, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांतील नागरिकांकडून केली जाते. सामानामध्ये खास यासाठी गुप्त कप्पे बनवून त्यामध्ये हे अंमली पदार्थ लपवून त्यांची तस्करी केली जाते. तसेच प्रवाशानेही अशा पदार्थाचे सेवन केलेले असते, असे आढळले आहे. मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाने अंमली पदार्थांची होणारी अवैध वाहतूक शोधण्यासाठी ‘स्निफर डॉग’चा प्रभावीपणे वापर केला आहे.

जप्त केलेल्या अंमली पदार्थांना जाळून नष्‍ट करणे आवश्यक असले तरीही ते पर्यावरणाच्‍या दृष्‍टीने हानीकारक आहे. त्यामुळे असे पदार्थ जाळून भस्मसात करण्‍यासाठी  प्रमाणित प्रदूषण नियंत्रण उपकरणे बसवलेल्या ’इन्सिनरेटर्स’ मध्ये करणे आवश्यक आहे.


Tags: DrugsmumbaiMumbai Custom Departmentअंमली पदार्थमुंबई सीमा शुल्क विभागमेसर्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड
Previous Post

मुंबई मेट्रो-३ मार्गावर नव्या वर्षात अंधेरी सीप्झ ते वांद्रे बीकेसी दरम्यान मेट्रो धावणार

Next Post

साऊथ हिट, बॉलिवूड फ्लॉप! ‘आरआरआर’पासून ‘कंतारा’, २०२२ ठरलं दक्षिणेचं वर्ष!

Next Post
South Movie

साऊथ हिट, बॉलिवूड फ्लॉप! 'आरआरआर'पासून 'कंतारा', २०२२ ठरलं दक्षिणेचं वर्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!