मुक्तपीठ टीम
मनपाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज मुंबईत कोरोना नव्या रुग्णांच्या संख्येने दहा हजाराचा टप्पा ओलांडला. त्याचवेळी सात हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज ३१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ७७ हजार ४९५ झाली आहे. आज दिवसभरात ४७ हजार ९२२ मुंबईकरांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील ३२ हजार ९२८ मुंबईकरांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहिमेतून माग काढण्यात आला.
मुंबईतील कोरोना आकड्यांमध्ये
- नवे रुग्ण १०,०३०
- बरे झालेले रुग्ण ७०१९
- एकूण सक्रिय रुग्ण ७७,४९५
- मृत्यू ३१
- आजच्या चाचण्या ४७,९२२
- बरे होण्याचे प्रमाण ८१%
- कोरोना संसर्ग वेग १.७९%
कन्टेन्टमेंट झोन
झोपडपट्ट्या – चाळी ७३
सिल केलेल्या इमारती ७४०