Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“लातूर जिल्हयात सर्वच यंत्रणांनी जबाबदारी लक्षात घेऊन काम करावे”

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांचे आवाहन

April 6, 2021
in सरकारी बातम्या
0
Amit deshmukh

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी लातूर जिल्हयातील सर्व यंत्रणांनी आपल्या जबाबदाऱ्या विभागून घेऊन अत्यंत कार्यक्षमपणे कार्यरत व्हावे कोणत्याही परिस्थितीत रूग्णसंख्या वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, मार्गदर्शक सूचनांची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश देऊन जिल्हयातील जनतेनी याकामी सकारात्मक राहून स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

लातूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना आखून त्यावरील अंमलबजावणीचे नियोजन करण्यासाठी लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे लातूर जिल्हयातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उप जिल्हाधिकारी ढगे, विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परगे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ.उदय मोहिते, डॉ.हरीदास हे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातून तर सर्व तालुक्याच्या ठिकाणाहून उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, आरोग्य अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

बैठकीत जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांच्याकडून जिल्हयातील कोरोना प्रादूर्भावाची व त्यावरील उपाययोजनांची माहिती घेतल्यानंतर देशमुख यांनी या प्रादूर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही परिस्थितीत मागच्या वर्षीएवढी रूग्णसंख्या वाढू नये याची दक्षता जिल्हयातील सर्व यंत्रणांनी मिळून घ्यावयाची आहे असे निर्देश त्यांनी दिले.

 

शहरांमधून प्रादूर्भाव अधिक, यंत्रणांनी सजग रहावे

जिल्हयातील एकुण रूग्णवाढीचा आढावा घेतला असता ग्रामीण भागाच्या तुलनेत लातुर व जिल्हयातील इतर शहरात रूग्णसंख्या अधिक गतीने वाढतांना दिसत आहे, त्यामुळे शहरातील कोरोना प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी वेगळे नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीवर जास्तीचे लक्ष देण्याच्या सूचना देशमुख यांनी दिल्या. एकदा रूग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील रूग्ण शोधण्यासाठी जलद मोहीम राबवावी ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट ही मोहीम प्रभावीपणे राबवावी असे आवाहनही त्यांनी केले.

 

मृत्यूदर कमी राहील याची काळजी घ्यावी

वेळेत चांगले उपचार मिळाल्यानंतर रूग्णांचा मृत्युदर कमी राहतो हा अनुभव लक्षात घेता जिल्हयातील आरोग्य यंत्रणांनी जास्तीत जास्त टेस्ट करून रूग्ण लवकरात लवकर उपचारासाठी येईल याचे नियोजन करावे त्यासाठी महसूल व इतर यंत्रणा त्यांना सहकार्य करतील असे त्यांनी म्हटले.

 

पोलीस यंत्रणांनी सक्ती करू नये

सध्या कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता निर्बंध जाहीर केले आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेनी करावी. हे करीत असतांना कोठेही सक्तीची वापर न करता समजावून सांगणे, प्रसंगी चर्चा करावी असे निर्देशही पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

 

तपासणी वाढवाव्यात

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तपासणीची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सर्व तहसिलदार व आरोग्य अधिकारी यांना सांगितले तपासणी वाढविण्यासाठी फार्मासिस्ट, आर्युवेदिक तसेच होमिओपॅथी संस्था यांची मदत घेणे शक्य आहे का हेही जिल्हाधिकारी यांनी तपासुन पहावे असे त्यांनी सांगितले.

खासगी लॅबमधून होणाऱ्या तपासण्यांची जिल्हा प्रशासनाकडे नोंद होते किंवा नाही हे तपासणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात येणाऱ्या. एकूण तपासणी किटची नोंद व्हावी जेणेकरून रूग्णांची नेमकी संख्या लक्षात येईल. शिवाय त्या रूग्णावरील उपचार आणि त्यांच्या संपर्कातील उपचार याची माहिती मिळू शकेल असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

 

वर्क फ्रॉर्म होमवर भर दयावा

शहरातील कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी या काळात वर्क फॉर्म होम बाबत जागृती करून त्याची अंमलबजावणी होईल यांची दक्षता प्रशासनाने घ्यावी. शाळा, कॉलेज, शिकवणी, होस्टेल यावर लक्ष ठेवावे असेही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

 

अतिदक्षता बेडची संख्या वाढवावी

लातूर जिल्हयातील शासकीय तसेच खाजगी रूग्णालयातील एकूण बेडची संख्या त्यापैकी अतिदक्षता विभागातील बेडची संख्या याची माहिती घेतल्यानंतर अतिदक्षता बेडची संख्या वाढविण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासन व विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेला दिले आहेत. लातूर येथील सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल येथे उभारण्यात आलेल्या कोरोना डेडीकेटेड रूग्णालयात आणखी वॉर्ड सुरू करावेत तसेच वैद्यकीय महाविदयालयाने अतिदक्षता विभागाचा विस्तार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. या ठिकाणी किंवा जवळपास कोरोना केअर सेंटर सुरू करता येते का ते पहावे, वैद्यकीय महाविद्ययालयातील सर्व यंत्रणा कार्यान्वित ठेवावी. एक्सरे, व्हेंटीलेटर यासारख्या यंत्रणा नादूरूस्त राहणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही त्यांनी म्हटले.

 

वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्न सर्व संस्थाचा सहभाग घ्यावा

कोरोना प्रादूर्भाव रोखण्याच्या कामी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित असलेली वैद्यकीय महाविद्ययालये, आर्युवेदिक, होमिओपॅथिक, नर्सीग, औषधशास्त्र महाविदयालये यांचे सहकार्य घ्यावे, गरज पडल्यास या ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारावेत अशी सूचनाही त्यांनी केली.

 

रेमडेसीवीरची कमतरता भासणार नाही; अधिकचे दर घेणाऱ्यावर कडक कार्यवाही

कोरोना रूग्णांच्या उपचाराच्या बाबतीत शासकीय तसेच खाजगी रूग्णालयांनी दक्ष रहावे औषधे, एक्सरे व इतर तपासण्या यांचे दर निश्चित केलेले आहेत त्यापेक्षा अधिकचे दर कोणीही घेणार नाही यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवावे असे सांगून रेमडेसीवीर इंजेक्शनची यापूढे कमतरता भासणार नाही असेही पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.

रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा लातूर जिल्हयासाठी उपलब्ध व्हावा यादृष्टीने संबंधित कंपनी व प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. याउपरही अडचणी येत असतील तर जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव यांच्याशी संपर्क साधावा असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

 


Tags: Amit deshamukhपालकमंत्री अमित देशमुखरेमडेसीवीर इंजेक्शनलातूर
Previous Post

राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार

Next Post

मुंबईत नव्या कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारावर, ७ हजार बरे!

Next Post
corona 7-3-21

मुंबईत नव्या कोरोना रुग्णांची संख्या दहा हजारावर, ७ हजार बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!