मुक्तपीठ टीम
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अहमदाबाद-मुंबई दरम्यान तेजस एक्स्प्रेस पुन्हा सुरू झालीय. कोरोनाच्या अनलॉक प्रक्रियेनंतर आता पुन्हा एकदा मुंबई-अहमदाबाद, दिल्ली-लखनौ दरम्यान तेजस एक्सप्रेस सुरू झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आयआरसीटीसीने स्टेशनवरच तेजस एक्स्प्रेससाठी तिकिटांचीही व्यवस्था केली आहे. तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी ट्रेन आहे.
रेल्वे बोर्डाने २३ नोव्हेंबर २०२० रोजी नवी दिल्ली ते लखनऊ दरम्यान तेजस एक्सप्रेस आणि २४ नोव्हेंबर रोजी मुंबई ते अहमदाबाद दरम्यान तेजस एक्सप्रेस बंद केली होती. त्यावेळी तेजस एक्सप्रेस बंद पडण्याचे कारण प्रवाशांच्या संख्येत घट असल्याचे सांगितले गेले.
सध्या तेजस एक्स्प्रेस चार मार्गांवर धावते. भारतीय रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-करमाली आणि चेन्नई एग्मोर-मदुरै जंक्शन तेजस एक्सप्रेस चालविते. लखनऊ-नवी दिल्ली ते मुंबई मध्य-अहमदाबाद दरम्यान तेजस एक्स्प्रेस आयआरसीटीसी चालविते.
नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस १५ फेब्रुवारीपासून तेजस एक्सप्रेस म्हणून चालविली जाणार आहे. तेजस एक्स्प्रेस भारतीय रेल्वेकडून चालविण्यात येणार आहे.
पुन्हा रेल्वे सेवा रुळावर…
• कोरोना संकटामुळे रेल्वेने रेल्वेगाड्या बंद केल्या.
• आता हळूहळू गाड्या सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
• सध्या मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर ७०४ लोकल गाड्या धावत आहेत, ज्यातून सुमारे ३.९५ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.
• मध्य रेल्वे मार्गावर ७०६ लोकल गाड्या धावत आहेत, ज्यामुळे सुमारे ४.५७ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.
पाहा व्हिडीओ: