मुक्तपीठ टीम
आशियातील श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी गेल्या आर्थिक वर्षासाठी पगार घेतलेला नाही. कोरोना महामारीमुळे व्यापार आणि अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:च पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुकेश अंबानींचा १५ कोटी पगार!
• रिलायन्सच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी मुकेश अंबानी यांनी कोणत्याही स्वरुपात पगार घेतलेला नाही.
• त्याआधीच्या आर्थिक वर्षात त्यांना कंपनीकडून १५ कोटी रुपयांचा पगार मिळाला होता.
• गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा पगार १५ कोटी रुपयेच आहे.
• मुकेश अंबानींचे चुलत भाऊ निखिल आणि हितल मेसवानी यांचा पगार २४ कोटी रुपये कायम राहिला आहे.
• यावेळी त्यात १७.२८ कोटी रुपयांचा कमिशन सामील आहे.
रिलायन्सनच्या संचालकांना बक्कळ मान आणि धनही!
• कार्यकारी संचालक पीएमएस प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांच्या मानधनात वाढ झाली आहे.
• २०२०-२१ मध्ये प्रसाद यांना ११.९९ कोटी रुपयांचा पगार मिळाला.
• गेल्या वर्षी पगार १.१५ कोटी होता.
• त्याचप्रमाणे कपिल यांचा पगार ४.०४ कोटी रुपयांवरून ४.२४ कोटी रुपये झाले.
• मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या कंपनीत नॉन एक्सिक्युटिव्ह डारेक्टर म्हणून कार्यरत आहे.
• त्यांना प्रत्येक मीटिंगसाठी आठ लाख रुपये आणि १.६५ कोटी रुपये कमिशन मिळाले.