Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुकेश अंबानींनी मुंबईत रजिस्टर केली महागडी कार! व्हीआयपी नंबरसाठी आरटीओने सुरु केली नवी सीरीज!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Mukesh Ambani buys Rolls Royce car in Mumbai

मुक्तपीठ टीम

भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येतात. कधी ते हॉटेल खरेदी करतात तर, कधी महागड्या कार्स. ते त्यांच्या कामाव्यतीरिक्त स्वत:चा छंदही जोपासतात. त्यांनी १३ कोटी १४ लाख रुपयांची आलिशान रोल्स रॉयस कार खरेदी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांची ही हॅचबॅक कार ब्रिटिश लक्झरी वाहन निर्माता रोल्स रॉयसची आहे.

 

देशातील सर्वात महागड्या कारची खरेदी मुकेश अंबानीने केली

कंपनीने दक्षिण मुंबईतील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजेच आरटीओमध्ये या कारची नोंदणी केली आहे.

आरटीओ अधिकार्‍यांच्या मते, रोल्स रॉयसचे कलीनन मॉडेल असलेली ही पेट्रोल कार देशातील आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या सर्वात महागड्या कार्सपैकी एक आहे.

 

महागडी कार मुकेश अंबानींच्या मागणीनुसार बदलांमुळे दुप्पट महाग!

  • मुकेश अंबानी यांच्यासाठी खरेदी केलेल्या या कारचा व्हीआयपी नंबरही घेण्यात आला आहे.
  • ही कार पहिल्यांदा २०१८ साली रोल्स रॉयसने बाजारात आणली होती. त्यावेळी त्याची किंमत ६.९५ कोटी रुपयांपासून सुरू होती. परंतु वाहन उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ग्राहकांच्या मागणीनुसार या कारमध्ये बदल केल्यानंतर त्याची किंमत वाढते.
  • अंबानींनी घेतलेल्या कारमध्येही मागणीनुसार बदल करण्यात आले, त्यामुळे किंमत जवळजवळ दुुप्पट १३ कोटी १४ लाख झाली.

 

२० लाख रुपये भरून करता येते कारची नोंदणी

  • या लक्झरी कारच्या नोंदणीसाठी आरआयएलने २० लाख रुपयांचा एकरकमी कर भरला आहे.
  • त्याची नोंदणी ३० जानेवारी २०३७ पर्यंत वैध असेल. याशिवाय रस्ता सुरक्षा कर म्हणून ४० हजार रुपयेही भरण्यात आले आहेत.
  • रिलायन्स कंपनीच्या ताफ्यात अनेक महागडी वाहने आधीपासूनच आहेत.
  • रोल्स रॉयसचे हे वाहन मॉडेल इतर काही उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटींकडेही आहे.

Tags: luxury carmukesh ambanimuktpeethmumbaiRolls-RoyceRTOvip numberआरटीओमुकेश अंबानीमुक्तपीठमुंबईरोल्स रॉयसलक्झरी कारव्हीआयपी नंबर
Previous Post

पर्यावरणपूरक शाश्वत विकासासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मांडली ‘वातावरणीय बदलाबाबत जनजागृती, मूल्यांकन आणि कृती’ची त्रिसूत्री!

Next Post

महाड येथे उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत पालकमंत्री आदिती तटकरेंकडून आढावा

Next Post
Aditi Tatkare instruction on flood control measures at Mahad

महाड येथे उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत पालकमंत्री आदिती तटकरेंकडून आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!