मुक्तपीठ टीम
भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येतात. कधी ते हॉटेल खरेदी करतात तर, कधी महागड्या कार्स. ते त्यांच्या कामाव्यतीरिक्त स्वत:चा छंदही जोपासतात. त्यांनी १३ कोटी १४ लाख रुपयांची आलिशान रोल्स रॉयस कार खरेदी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची ही हॅचबॅक कार ब्रिटिश लक्झरी वाहन निर्माता रोल्स रॉयसची आहे.
देशातील सर्वात महागड्या कारची खरेदी मुकेश अंबानीने केली
कंपनीने दक्षिण मुंबईतील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात म्हणजेच आरटीओमध्ये या कारची नोंदणी केली आहे.
आरटीओ अधिकार्यांच्या मते, रोल्स रॉयसचे कलीनन मॉडेल असलेली ही पेट्रोल कार देशातील आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या सर्वात महागड्या कार्सपैकी एक आहे.
महागडी कार मुकेश अंबानींच्या मागणीनुसार बदलांमुळे दुप्पट महाग!
- मुकेश अंबानी यांच्यासाठी खरेदी केलेल्या या कारचा व्हीआयपी नंबरही घेण्यात आला आहे.
- ही कार पहिल्यांदा २०१८ साली रोल्स रॉयसने बाजारात आणली होती. त्यावेळी त्याची किंमत ६.९५ कोटी रुपयांपासून सुरू होती. परंतु वाहन उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ग्राहकांच्या मागणीनुसार या कारमध्ये बदल केल्यानंतर त्याची किंमत वाढते.
- अंबानींनी घेतलेल्या कारमध्येही मागणीनुसार बदल करण्यात आले, त्यामुळे किंमत जवळजवळ दुुप्पट १३ कोटी १४ लाख झाली.
२० लाख रुपये भरून करता येते कारची नोंदणी
- या लक्झरी कारच्या नोंदणीसाठी आरआयएलने २० लाख रुपयांचा एकरकमी कर भरला आहे.
- त्याची नोंदणी ३० जानेवारी २०३७ पर्यंत वैध असेल. याशिवाय रस्ता सुरक्षा कर म्हणून ४० हजार रुपयेही भरण्यात आले आहेत.
- रिलायन्स कंपनीच्या ताफ्यात अनेक महागडी वाहने आधीपासूनच आहेत.
- रोल्स रॉयसचे हे वाहन मॉडेल इतर काही उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटींकडेही आहे.