Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शन मिळतच नाहीत! रुग्णालयांचे हात वर, डॉक्टरही हतबल! राज्य सरकार करतेय काय?

May 21, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
amphotericin not available

मुक्तपीठ टीम

राज्यात ‘म्युकर मायकोसिस’चे रुग्ण वाढत आहे, मात्र उपचारात वापरल्या जाणाऱ्या ‘अॅम्पोटेरेसिन-बी’ या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची दिवसभर धावपळ सुरू असते. मुंबईसारख्या महानगरातही सरकारी यंत्रणा या इंजेक्शनचा रुग्णालयांना पुरवठा करण्याबाबत अपयशी ठरत असल्याच्या तक्रारी, रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. राज्य सरकारच्या यंत्रणेने बाजारात होता तोही साठा ताब्यात घेतल्याने आता रुग्णांच्या नातेवाईकांपुढे आपल्या माणसांच्या उपचारासाठी करायचे तरी काय, असा जीवना-मरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

अगदी डॉक्टरांना स्वत:च्या नातेवाईकांवर उपचारासाठीही हे इंजेक्शन मिळत नसल्याने प्रचंड हतबलता जाणवत आहे. त्यातच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी म्युकर मायकोसिसवरील उपचारासाठी सरकार जबाबदारी घेणार असल्याचे सांगितले असले तरी मुंबईतील परळचे ग्लोबल आणि अन्य खासगी रुग्णालये मात्र भरमसाठ दर आकारूनही रुग्णांवर योग्य उपचार करण्यात कमी पडत आहेत. अनेक राज्यांमधील सरकारी यंत्रणेकडून या इंजेक्शनचा रुग्णांना पुरवठा करण्यात येत आहे, महाराष्ट्रात मात्र इंजेक्शनचा साठा जप्त करण्यापलीकडे सरकारने काहीही केलेले नसल्याने रुग्णांचे नातेवाईक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.

 

रुग्णांची वाढती संख्या, औषधाचा तुटवडा! आरोग्य मंत्र्यांचे केंद्राकडे बोट

• म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या वाढत आहे.
• या आजाराच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या ‘अॅम्पोटेरेसिन-बी’ या इंजेक्शची मागणी अनेकपटींनी वाढली आहे.
• औषध मिळत नसतानाच सरकारी यंत्रणेने जेथे ते उपलब्ध होते, तेथूनही ते जप्त केले आहे.
• आता ते मिळत नसल्याने नातेवाईकांची तडफड सुरू आहे.
• रुग्णांची संख्या वाढत आहे, पण औषध मिळतच नाही.
• राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आम्ही या औषधाची खरेदी करण्यासाठी तयार आहोत पण पुरेसे मिळवण्यासाठी केंद्राचीच परवानगी लागते, असे गुरुवारी माध्यमांना सांगितले.
• मात्र, प्रत्यक्षात मुंबईसारख्या ठिकाणी रुग्णांना ते सरकारी यंत्रणेकडून मिळावे, यासाठी काही व्यवस्थाच केलेली नाही.
• खासगी रुग्णालयं रुग्णांना दाखल करून घेत आहेत, पण औषध देऊ शकत नाहीत. त्यामुळे रुग्णांवर आर्थिक बोजा वाढत आहे, पण उपचारही मिळत नाहीत.

 

डॉ. ग्रिष्मा यांचे राज्य सरकारला सवाल

म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना एकप्रकारे राज्य सरकारनेही वाऱ्यावरच सोडले आहे. त्यामुळे सरकारी कारभाराबद्दल प्रचंड संताप रुग्णांकडून व्यक्त केला जात आहे. मुंबईतील गायनाकॉलॉजिस्ट डॉ. ग्रिष्मा यांनी राज्याचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आणि मुंबई मनपाला मेन्शन करत ट्विट करत रुग्णालयातील परिस्थितीबद्दल सांगितले आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की,गेल्या ५ दिवसात लोअर परेलच्या ग्लोबल रुग्णालयात ‘अॅम्पोटेरेसिन-बी’चा पुरवठा झालेला नाही हे तुमच्या लक्षात आणून देत आहे. येथे म्युकर मायकोसिसचे २० रुग्ण दाखल आहेत. आपण मोठी हानी होण्यापूर्वी त्वरित काहीतरी कृती करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यांच्या वडिलांवरही परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पण तेथील व्यवस्थापन इंजेक्शन पुरवले जात नसल्याचे सांगत राज्य सरकारकडे बोट दाखवत आहे. त्यामुळे त्यांनी हतबलतेने काही ट्विट केले आहेत.

 

.@bmc @rajeshtope11 @OfficeofUT @AUThackeray @mybmcWardGN @CMOMaharashtra This is to bring to your notice that Global Hospital Lower Parel hasn’t received any supply of Amphotericin in last 5 days.20 patients of mucormycosis are admitted here. Act before you see mass casualty

— DrGrishma (@idovoodoo_) May 20, 2021

त्यांच्या ट्विट मालिकेतील महत्वाचे मुद्दे

• रुग्णांवर उपचारासाठीच औषध नाही!
• त्या पुढे म्हणाल्या की, रूग्ण स्वत: हून इंजेक्शनची व्यवस्था करतात असे सांगितले जात आहे.
• प्रत्येक रुग्णाला दररोज ८ कुपी आवश्यक असतात.
• उपचारांचा एकूण कालावधी २८ दिवस असतो.
• यामुळे प्रत्येक रुग्णामागे २२० हून अधिक कुपी लागतात.
• कुठेही एकही कुपी उपलब्ध नाही.
• एका रात्रीत हा साठा ‘गायब’ झाला आहे.

 

Patients are being told to arrange for injection by themselves. To understand the scenario, each patient needs 8 vials daily and total duration of treatment is 28 days. Which is 220+ vials per patient. Not a single vial is available, nowhere. The stock has ‘disappeared’ overnight

— DrGrishma (@idovoodoo_) May 20, 2021

देशाच्या आर्थिक राजधानीतच रुग्ण औषधाविना!

• माझे वडीलही रुग्णालयात दाखल आहेत.
• या देशाची आर्थिक राजधानी जिथे मी एक जीवन वाचवणारे औषध शोधण्यासाठी धडपडत आहे, एक डॉक्टर म्हणून मी इतके करुनसुद्धा मला शक्तिहीन असल्याचे जाणवते.
• इतर रुग्ण काय सहन करत आहे याची मी कल्पना करू शकते.

 

My father is admitted as well. As a doctor despite all I can do I feel powerless in this city, the financial capital of the country where I’m struggling to find one life saving medicine. I can only imagine what other pts are going through.

— DrGrishma (@idovoodoo_) May 20, 2021

डॉक्टरांचा अर्धा वार्षिक पगार इंजेक्शनच्या अर्ध्या कोर्सवर खर्च!

• मी डॉक्टर म्हणून असलेला माझा वर्षभराचा पगार इंजेक्शनचा अर्धा कोर्स मिळवण्यासाठीच खर्च केला.
• एका औषधासाठी दिवसाला सत्तर हजार, शस्त्रक्रिया आणि इतर चाचण्यांचा खर्च वेगळा.
• आम्ही ज्या औषधांची भिक मागतो आहोत त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत.
• याच्याशी तुलना करता कोरोनाशी लढत देणे खूपच छोटं वाटू लागलं आहे, असे डॉक्टर ग्रीष्मा यांनी सांगितले.

 

I have spent my annual doctor salary procuring half the Inj course. 70k per day only for one medicine, surgery and other tests cost more. Lakhs of Rupees yet to be spent on medicines that we are begging for. Surviving Covid seems to be the smallest prob compared to all this

— DrGrishma (@idovoodoo_) May 20, 2021

बाजारातून औषध जप्त का केले?

• बाजारातून सर्व कुपी जप्त करणे एखाद्या योजनेचा एक भाग असल्यास, कृपया त्याची माहिती लोकांना द्या.
• लोकांना अंधारात ठेवू नका. परिस्थिती काय आहे ते आम्हाला सांगा.
• औषध कुठे आहेत, बाजारात कधी उपलब्ध होतील.
• मी मुंबई मनपा / एफडीएमध्ये कॉल केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला याची कल्पना नाही.
• त्यांना ‘वरून’ कोणतेही आदेश आलेले नाहीत.

If confiscating all vials from market is a part of a plan pls keep the ppl informed, not in the dark. Inform us what the situation is, where are the meds, when will they be in market. No officer I have called in BMC/ FDA has any idea. They haven’t received any orders from ‘above’

— DrGrishma (@idovoodoo_) May 20, 2021


Tags: amphotericinHealth Minister Rajesh Topemucormycosismumbaiअॅम्फोटेरेसिनम्युकर मायकोसिस
Previous Post

“मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांचा दौरा दोनच जिल्ह्यांचा का?”

Next Post

गडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा, सी-६० पोलीस पथकाची कामगिरी

Next Post
naxal

गडचिरोलीत १३ नक्षलवाद्यांचा खात्मा, सी-६० पोलीस पथकाची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!