Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठीप्रेमींना आवाहन

December 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठीप्रेमींना आवाहन

मक्तपीठ टीम

मराठी शाळा गुणवत्तापूर्ण व्हाव्यात, सोबतच त्यांचे वर्षानुवर्षे न सुटणारे प्रश्न सुटावेत, त्या टिकाव्यात व वाढाव्यात या हेतूने मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मराठी शाळांची चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रभर जिल्हावार बैठकींचे आयोजन केले जात आहे. या संदर्भातील चौथी बैठक रविवारी, १२ डिसेंबर रोजी, सोशल सर्व्हिस लीग शाळा, परळ (पूर्व) येथे सकाळी १० वा. आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी पालक, शिक्षक, संस्थाचालक व मराठीप्रेमी यांना आवाहन करण्यात येत आहे.

या बैठकीला मराठी माध्यमात शिक्षण घेतल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये नोकरी नाकारलेले उमेदवार उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिकेच्या प्राथमिक खाजगी अनुदानित शाळेत पंचवीस-तीस वर्षे नोकरी करूनही निवृत्त झालेले शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना निवृत्त होऊन आठ-दहा वर्षे होऊन आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देऊनही पेन्शन मिळत नसलेले  कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सोबतच १८ ते २० वर्षांपासून सुरू असलेल्या मराठी शाळांना अनुदान मिळत नसल्याने त्यांचे संस्थाचालकही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

याव्यतिरिक्त मराठी शाळांशी संबंधित अडचणी असलेल्या लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी अभ्यास केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

मुंबईत मागील दहा वर्षांत मराठी शाळांची संख्या व विद्यार्थी संख्या निम्मी झाल्याची आकडेवारी पुढे येत आहे व महानगरपालिका यावर मंथन न करता इतर मंडळांच्या शाळा काढण्यात धन्यता मानत असेल, तर अशा मुद्द्यावर चर्चा व्हायलाच हवी, जाब विचारायला हवा. मराठी शाळा बंद करण्याचा हा डाव असल्याने व एकही राजकीय पक्ष यावर बोलत नसल्याने मुंबई व महाराष्ट्रातील मराठी शाळांसाठी दबावगट, संघटन निर्माण करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – सुशील शेजुळे ९६०४५२३६६६.


Tags: Marathi Studies Center and like-minded institutionsmumbaiParal (East)Social Service League Schoolपरळ (पूर्व)मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थामराठी शाळामुंबईसोशल सर्व्हिस लीग शाळा
Previous Post

देशातील आठ राज्यांमधील २७ जिल्ह्यांमध्ये कोरोना वाढतोय! घाबरू नका, पण काळजी घ्या!

Next Post

महाराष्ट्र शासन ओबीसी आरक्षणासंदर्भात १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार

Next Post
Chhagan Bhujbal on OBC reservation 10-12-21

महाराष्ट्र शासन ओबीसी आरक्षणासंदर्भात १३ डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!