मुक्तपीठ टीम
धोनी क्रिकेटसह वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. महेंद्रसिंग धोनीने आता अनेक व्यवसायांमध्ये प्रवेश केला आहे. झारखंडची राजधानी रांची येथे त्याचा पहिला रिटेल आउटलेट इजा फार्म म्हणून सुरु झाला आहे. यामध्ये सेंद्रिय भाज्यांबरोबरच दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच दूध, तूप व इतर अनेक खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. रिटेल व्यवसायाच्या माध्यमातून टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढवत आहे. धोनीच्या रिटेल आउटलेट व्यवसायात सर्वात महागडे तूप विकले जात आहे. २५० ग्रॅमची किंमत ३०० रूपये आहे, म्हणजेच बाराशे रुपये प्रतिकिलो आहे.
धोनीची क्रिकेटींगची शैली आणि फॅशन ज्या प्रकारे लोकांना आकर्षित करते, त्याचप्रमाणे त्याचे हे आउटलेट चाहत्यांची आणि ग्राहकांचीही प्रचंड गर्दी आकर्षित करत आहे. माहीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्यांच्या मनात अजूनही त्यांची छाप कोरलेली आहे. आता माहीच्या फार्म हाऊसचे आरोग्यदायी उत्पादन त्यांचे आरोग्य सुधारतील, असा त्यांचा विश्वास आहे. धोनीच्या उत्पादनाच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी प्रशंसा केली जात आहे.
धोनीच्या इजा फार्मच्या व्यवसायात भाजीपाला, स्ट्रॉबेरी आणि दूध-तूप विकले जात आहे. महेंद्रसिंग धोनीचे रांची येथे ४३ एकरचे फार्म हाऊस आहे. जेथे धोनी सेंद्रिय भाज्या व फळांची लागवड करीत आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या इजा फार्मसचे दरपत्रक
- वाटाणे- ५० रुपये किलो
- कॅप्सिकम- ६० रुपये किलो
- बटाटा- १५ रुपये किलो
- बीन्स- ४० रुपये किलो
- पपई- ४० रुपये किलो
- ब्रोकोली- २५ रुपये किलो
- दूध- प्रती लिटर ५५ रुपये
- तूप- २५० ग्रॅम ३०० रुपये
- स्ट्रॉबेरी- २०० रुपये २०० ग्रॅम
महेंद्रसिंग धोनीच्या इझा फार्मचा रिटेल आउटलेट रांचीमध्ये सुरू झाला आहे. हे आउटलेट मेन रोडवरील सुजाता चौक जवळ उघडले गेले आहे. येथे धोनीच्या फार्म हाऊसची सेंद्रिय भाजीपाला व दुग्धजन्य पदार्थ दूध-तूप विकले जात आहेत. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसमध्ये केवळ उत्पादित सेंद्रिय भाजीपाला परदेशात पाठविला जात होता.
पाहा व्हिडीओ:
Enterprising Dhoni