मुक्तपीठ टीम
मृदुला शिळीमकर…जी आपल्या भावासोबत हायवेवर भाजीचा धंदा करतेय, त्यावेळीच ती बीबीए पदवीचंही शिक्षणही घेतेय…जीवनातलं तिचं एकचं ध्येय, तिला जास्तीत जास्त पुढे जायचं आहे. तिची सध्याची परिस्थिती बदलून स्वबळावर चांगली करायची आहे. अशा मृदुलाची कहाणी मुक्तपीठने आपल्या गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रात मांडली होती. या चांगल्या बातमीचा सुगंध सर्वत्र दरवळला. बारामतीत शारदा सन्मान सोहळ्यात तिचाही गौरव झाला. सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सूनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी गुणवंत महिलांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी हा कार्यक्रम बारामतीतील आप्पासाहेब पवार सभागृह येथे संपन्न झाला. हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. पूर्ण महाराष्ट्रामधून एकूण २० महिलांचा सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या २० महिलांमध्ये मृदुलाचाही समावेश होता. मुक्तपीठने मृदुलाची बातमी केली आणि या बातमीच्या आढावा घेत तिला बारामती येथे आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये तिच्या कामगिरी बद्दल सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार देण्यात आला.
आत्ताच मागे मुक्तपीठने तिच्या जीवनावर आणि तिच्या भावी स्वप्नांबद्दल गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रात माहिती दिली. गुड न्यूज मॉर्निंगचा तिचा व्हिडीओ सुनंदा ताई पवार यांच्यापर्यंत पोहचला आणि तो पाहून ती या पुरस्काराची पात्र ठरली. तिचा हा व्हिडिओ तुळशीदाक भोईटे सर यांनी काढला होता. आज त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले असे सांगत मृदुलाने त्यांचे आभार मानले. तिने याचे श्रेय तिच्या आईला दिलं कारण तिच्या डोळ्यासमोरच एक सक्षम आणि कर्तृत्ववान स्त्री तिची आई एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आईन काम करण्यासाठी कधी लाजू नये हा मोलाचा सल्ला कायम दिला.
कोण आहे मृदुला शिळीमकर?
- मृदुला पुण्यातील केळवडे येथिल रहिवासी.
- भाजीचा छोटासा व्यवसाय ती करतेय.
- ती सध्या बीबीएच्या पहिल्या वर्षी आहे.
- मृदुलाचे कुटुंब शेतकरीच आहे.
- वडिलांचं निधन झाल्यामुळे आईला हातभार लावण्यासाठी ती आणि तिचा भाऊ भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. मृदुलाला पुढे फायनान्स घेवून बॅंकिंग करायचे आहे.
- मृदुलाच्या जीवनातलं एकचं ध्येय आहे जे तिला जास्तीत जास्त पुढे जायचं आहे.
- यासाठी ती चांगलं शिक्षणं घेणार आहे.
- तिचे सरहद कॉलेजही चांगले आहे, त्यांच्याकडूनही सहकार्य लाभतं.