Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

Mrs. World 2022: जम्मूच्या सरगम ​​कौशलने भारताच्या २१ वर्षांच्या तपश्चर्येनंतर मिळवला विजय!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Sargam Kaushal

 मुक्तपीठ टीम

भारताच्या सरगम ​​कौशलने मिसेस वर्ल्ड २०२२चा किताब आपल्या नावावर करत मोठा विजय मिळवला आहे. तिने मिळवलेला विजय हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. सरगम कौशल ही जम्मू-काश्मीरची मूळ रहिवासी असून ती शिक्षिका आणि मॉडेल आहे. जम्मूच्या बाहू फोर्ट येथील सरगमच्या घरी अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली आहे. सरगमने ६३ देशांतील महिलांना मागे टाकत हे विजेतेपद पटकावले आहे.

यावेळी मिसेस पॉलिनेशियाला ‘फर्स्ट रनर अप’ आणि मिसेस कॅनडाला ‘सेकंड रनर अप’ म्हणून घोषित करण्यात आले. मिसेस इंडिया पेजेंटने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर विजेत्याची घोषणा केली आहे.

सरगम कौशल ही एक ‘शिक्षिका’ आहे!

  • सरगम कौशल व्यवसायाने शिक्षक आहे.
  • सरगमचे वडिल जीएस कौशल, बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक आहेत.
  • वडिल म्हणाले की, सरगमच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. सरगमला शिक्षण क्षेत्रात विशेष रस आहे.
  • शिक्षकांचा जुना आदर परत यावा, अशी तिची इच्छा आहे.

कार्यक्रमानंतर एका व्हिडिओमध्ये सरगम म्हणाली की, ‘आम्हाला २१-२२ वर्षांनंतर ताज परत मिळाला आहे. मी खूप उत्सुक आहे. भारतावर प्रेम करा, जगावर प्रेम करा. आदिती गोवित्रीकरने २००१ मध्ये शेवटचे विजेतेपद पटकावले होते.’

सरगम कौशच्या वैयक्तिक जीवनाबाबत माहिती

  • सरगम कौशलचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर तिने ब्यूटी पेजेंट जिंकण्याचा निर्धार केला होता.
  • यानंतर ती मुंबईत आली आणि मॉडेलिंगला सुरुवात केली आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. मिसेस इंडियामध्येही ती सहभागी झाली होती.
  • सरगम कौशल ३२ वर्षांची आहे आणि तिने अंतिम फेरीसाठी भावना राव यांनी डिझाइन केलेला चमकदार गुलाबी स्लिट गाऊन परिधान केला होता.
  • सरगमने इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
  • सरगम कौशलचे पती नौदलाचे अधिकारी असून त्याची ड्युटी मुंबईत आहे.
  • ती आता अमेरिकेत आहे.

Tags: good newsIndiaJammu And KashmirMiss World 2022Mrs India PageantmuktpeethSargam Kaushalघडलं-बिघडलंचांगली बातमीजम्मू काश्मीरभारतमिसेस इंडिया पेजेंटमिसेस वर्ल्ड २०२२मुक्तपीठसरगम ​​कौशल
Previous Post

जळगाव जिल्हा शैक्षणिक घोटाळा प्रकरणी तत्कालीन शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता का नाही?

Next Post

#महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन: विधानपरिषद १९ डिसेंबर २०२२

Next Post
#महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन: विधानपरिषद १९ डिसेंबर २०२२

#महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन: विधानपरिषद १९ डिसेंबर २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!