Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मंत्र्याच्या, अधिकाऱ्याच्या पोरानं आत्महत्या केली की कळेल गरीबाचं पोरगं मेल्यावरच्या वेदना!”

स्वप्निल लोणकरच्या आईचा टाहो...

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Swapnil Lonkar mpsc suicide mother

मुक्तपीठ प्रतिनिधी

एमपीएससी परीक्षा पास होऊनही  नियुक्ती मिळत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या आईचा हंबरडा कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करील असाच आहे. “सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केलीय. सरकारने जर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली असती तर आमच्या स्वप्निलने आत्महत्या केली नसती, असा आरोप स्वप्निलच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच त्याच्या आईनं फोडलेला टाहो अनेकांना खुपणारा पण तिच्या मनातील असह्य वेदना दाखवणाराच आहे, ती म्हणाली, “एखाद्या मंत्र्याच्या, अधिकाऱ्याच्या पोरानं आत्महत्या करावी. करावी. करावी. त्याशिवाय त्यांना कळणार नाही, एखाद्या गरीबाचं पोरगं मेल्यावर त्यांना काय वेदना होतात”.

 

स्वप्निलच्या आईचा टाहो

“आई तुला लई त्रास होतो का ग. मला नोकरी लागली की तुला नाय पाठवायचो कामाला. आपण घर बांधू. आपल्या पूजाचं लग्न चांगलं करु. आपण गाडी घेऊ. खूप बोलायचा हो. सरकारला नाही जाग आली. मी म्हणते एखाद्या मंत्र्याच्या, अधिकाऱ्याच्या पोरानं आत्महत्या करावी. करावी. करावी. त्याशिवाय त्यांना कळणार नाही, एखाद्या गरीबाचं पोरगं मेल्यावर त्यांना काय वेदना होतात. जोपर्यंत त्यांच्या घरात असं काही होत नाही तोपर्यंत त्यांना कळणारच नाही दुसऱ्याचं दु:ख काय असतं.”

 

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची अस्वस्था समजून घ्या…

  • एमपीएससीच्या परीक्षांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण निमशहरी भागातील तरुण सहभागी होतात.
  • त्यांच्या विभागांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी नसल्याने एमपीएससी उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरी असं त्यांचे लक्ष्य असते.
  • त्यासाठी अनेक विद्यार्थी प्रसंगी कर्ज काढून पुण्यात राहतात.
  • पुण्यातील अनेक व्यावसायिक शिक्षणसंस्थाही अशा मुलांना वास्तवाची माहिती न देता आपल्या चक्रात ओढतात.
  • ग्रामीण मुलं क्लासचा खर्च, पुण्यातील राहण्याचा, खाण्याचा खर्च यात अडकतात.
  • खर्च वाढत राहतो, परीक्षा वेळेवर नाहीत, नियुक्त्यांचा पत्ता नाही, यामुळे पिचतात.
  • गेली दोन वर्षे कोणतीच परीक्षा झाली नाही.
  • एमपीएससीवर नियुक्त्याही नाहीत.
  • जे एमपीएससी उत्तीर्ण झाले आहेत त्यांनाही नियुक्ती नसल्याने इतरांमध्येही नैराश्य वाढत आहे.
  • विद्यार्थी आता हतबलतेने पछाडले आहेत. विद्यार्थ्यांना एक प्रकारचं नैराश्य आले आहे.
  • सरकारला आता तरी जाग आली पाहिजे, या मुलांना दिलासा देणारी पावलं त्वरित उचलली पाहिजेत.

Tags: MPSCmpsc suicideswapnil lonkarएमपीएससीएमपीएससी आत्महत्यास्वप्निल लोणकर
Previous Post

शौचालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष…नेमका ओळखा धोका!

Next Post

राजकारणीहो, समजून घ्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या वेदना!

Next Post
Mpsc Problems

राजकारणीहो, समजून घ्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या वेदना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!