मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ घेण्यात येणार आहे. ही परीक्षा १७ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे. या परीक्षेचे केंद्र औरंगाबाद, अमरावती मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर असणार आहे. तसेच, वनक्षेत्रपाल, गट-ब या पदासाठी १३ जागा, उप संचालक, कृषी व इतर गट-अ या पदासाठी ४९ जागा, तालुका कृषि अधिकारी व इतर, गट-अ या पदासाठी १०० जागा, कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब या पदासाठी ६५ जागा, सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-२ या पदासाठी १०२ जागा, सहायक अभियंता,विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-२ या पदासाठी ४९ जागा अशा एकूण ३७८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- विज्ञान शाखेतील पदवी/ अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.२, ३ आणि ४ साठी- कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी
- पद क्र.५- स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.६- विद्युत/ यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ३९४ रूपये शुल्क आकारले जाणार तर, ओबीसी/ ईडब्ल्यूएस/ अनाथ वर्गातीलअसलेल्या उमेदवारांकडून २९४ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1gutWQ3DEd2iqwwu4v26AfsnyVo_vRg11/view