एमपीएससी परिक्षेच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परिक्षा-२०२०, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षा-२०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परिक्षा-२०२० या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या तारखे नुसार राज्य सेवा पूर्व परिक्षा-२०२० ची परीक्षा रविवार १४ मार्च २०२१ रोजी, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परिक्षा-२०२० शनिवार २७ मार्च २०२१ आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परिक्षा-२०२० रविवार ११ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.
#MPSC
MPSC चे वेळापत्रक जाहीर. pic.twitter.com/CypvvHbAxf— Mpsc समन्वय समिती महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) January 11, 2021
या अगोदर २०२० मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात या परिक्षा होणार होत्या. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केले जात होते. तसेच यानंतर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या परीक्षेच्या आयोजनासंबंधित योग्य माहिती आपल्याला समजण्यासाठी संकेतस्थळाला नियमित भेट देणे उमेदवारांच्या हिताच ठरेल, असे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून कळविण्यात आले आहे.