मुक्तपीठ टीम
अडीच वर्षांपासून रखडलेल्या एमपीएससीच्या २०२०च्या संयुक्त मुख्य परीक्षेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या परीक्षेस १३ हजार ९०९ उमेदवार बसले. त्यानंतर २०२१च्या सप्टेंबरमध्ये पूर्व परीक्षाही झाली. मात्र अद्याप मुख्य परीक्षा न झाल्याने त्यांचं भवितव्य अधांतरी हेलकावत आहे. त्यांचा आक्रोश वाढत आहे. सरकार या उमेदवाराच्या प्रश्नावर दुर्लक्ष करत आहे. संयुक्त मुख्य परीक्षा २०२० चा न्यायालयीन तिढा सुटून लवकरात लवकर परीक्षा व्हावी अशी मागणी या उमेदवारांची आहे. यासाठी या १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी माध्यम व पत्रकारांना पत्र लिहिलं आहे.
पत्र जसं आहे तसं…
२६ एप्रिल २०२२
प्रति,
माध्यमं, पत्रकार
विषय:- संयुक्त मुख्य परीक्षा २०२० चा न्यायालयीन तिढा सुटून लवकरात लवकर परीक्षा व्हावी,
महोदय,
संयुक्त परीक्षा २०२० जाहिरात फेब्रुवारी २०२० मध्ये आली. त्यानंतर कोरोना आणि अन्य कारणांमुळे परीक्षा चार वेळा पुढे ढकलण्यात आली. अखेरीस अनंत अडचणींचा सामना करून अखेर ४ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्व परीक्षा झाली. आयोगाच्या पद्धतीनुसार दोन उत्तरतालिका अपेक्षित असताना आयोगाने तिसरी उत्तरतालिका जाहीर करून उत्तरतालिकेचा गोंधळ घालून ठेवला. तिसऱ्या उत्तरतालिकेवर उमेदवारांनी MAT मुंबई, औरंगाबाद, नागपूरमध्ये आक्षेप घेण्यात आले. मुंबई MAT ने आयोगाच्या बाजूने निकाल ०८ फेब्रुवारी रोजी दिल्यानंतर पुन्हा याचिकाकर्ते मुंबई उच्च न्यायालयात गेलेत. त्यांनी रीतसर पद्धतीने १७ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून गेल्या दोन महिन्यांत यावर एकही सुनावणी झाली नसून PSI, STI, ASO मुख्य परीक्षेची तयारी करणारे उमेदवार नैराश्याने ग्रासले आहेत. न्यायालयीन प्रक्रिया कधी पुर्ण होणार, अंतिम निकाल जाहीर होउन आयोग परीक्षा कधी घेणार हा सद्यपरिस्थितीत उमेदवारांसमोर उभा ठाकलेला यक्षप्रश्न असून त्यावर आयोग, उच्च न्यायालय, MAT आणि न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या सर्वांनी तातडीने मार्ग काढून या परीक्षेच्या मार्गातील अडथळा दूर करणे आवश्यक आहे.
संयुक्त मुख्य परीक्षा २०२० लवकरात लवकर न झाल्यास आयोगाच्या २०२२ मधील संपूर्ण वर्षाच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. संपुर्ण वर्षाचे वेळापत्रक कोलमडून पडल्यास याचा परिणाम संपूर्ण MPSC करणाऱ्या उमेदवारांवर होणार असून तातडीने तोडगा आवश्यक आहे. मे महिन्यात उच्च न्यायालयाची सुट्टी सुरु होणार असून त्या कालावधीत कामकाज बंद आहे. त्यामुळे एप्रिल महिना अखेर न्यायालयातील प्रलंबीत सुनावण्या आणि अंतिम निकाल आल्यास पुढील महिन्यात (मे अखेर) परीक्षा आयोग घेऊ शकतो.
राज्य सरकारला सर्व उमेदवारांच्या वतीने कळकळीची विनंती आहे की, आयोगाने हा तिढा सोडवण्यासाठी तातडीची पावले उचलून या आठवड्यात न्यायालयीन तिढा सुटल्यास पुढील महिन्यात आयोग परीक्षा घेऊ शकतो
शासन हा मुद्दा तातडीने सोडवून १३९०९ उमेदवारांना न्याय देईल
कळावे,
मुख्य परीक्षेला पात्र असणारे १३९०९ उमेदवार
सी’चे विद्यार्थी न्याय