Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पिकांसाठी नवे किमान हमी भाव जाहीर! जाणून घ्या किमान हमी दराबद्दल सर्व काही…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mps increased for farmers, know what is msp in marathi

मुक्तपीठ टीम

केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी २०२२-२३ च्या खरीप हंगामातील १७ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वाढीमुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या दीडपट भाव देण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटलं. एमएसपी वाढवण्याच्या प्रस्तावात भाताच्या दरात १०० रुपये, मूग ४८० रुपये, सूर्यफूल ३८५ रुपये आणि तीळ ५२३ रुपये प्रति क्विंटल वाढले आहेत.

पिकाच्या किमतीच्या ५० ते ८५ टक्क्यांनी एमएसपी जास्त ठेवला!!

  • मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की मंजूर एमएसपी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या किमान दीड पट किंमत देण्याच्या सरकारच्या तत्वतः निर्णयाशी सुसंगत आहे.
  • आम्ही पिकाच्या किमतीच्या ५० ते ८५ टक्क्यांनी एमएसपी जास्त ठेवला आहे.
  • ठाकूर म्हणाले की, “भात, ज्वारी, नाचणी, मूग आणि कापूस या आठ पिकांचा एमएसपी त्यांच्या किंमतीपेक्षा ५० टक्के जास्त ठेवण्यात आला आहे.
  • बाजरीची आधारभूत किंमत त्याच्या किमतीच्या ८५ टक्के, तूर ६० टक्के, उडीद ५९ आणि सूर्यफूल ५६ आणि सोयाबीनची ५३ टक्के किंमत एमएसपीपेक्षा जास्त आहे.

एमएसपी म्हणजे काय?

किमान आधारभूत किंमत (MSP) (एमएसपी) ही किमान किंमत आहे ज्यावर सरकार शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते.
अशा प्रकारे हे देखील समजू शकते की सरकार शेतकऱ्याला त्यांच्याकडून खरेदी केलेल्या पिकावर जे पैसे देते ते एमएसपी आहे.
याखालील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा मोबदला दिला जात नाही.

एमएसपी का ठरवला जातो?

पिकाची एमएसपी निश्चित केली जाते जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी कोणत्याही परिस्थितीत वाजवी किमान किंमत मिळावी.

एमएसपी कोण ठरवतो?

रब्बी आणि खरीप हंगामात वर्षातून दोनदा कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या (सीएसीपी) शिफारशींच्या आधारे, दरवर्षी तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया आणि व्यावसायिक पिके यासारख्या कृषी पिकांसाठी राज्य सरकारे आणि केंद्रीय मंत्रालये/विभागांचे मत विचारात घेऊन सरकार एमएसपी घोषित करते.


Tags: central govtMSPएमएसपीकिमान आधारभूत किंमतकेंद्र सरकार
Previous Post

शरद पवार: ईडीलाच दिलं होतं आव्हान, ईडीपिडेतूनही राजकीय फायदा!

Next Post

राजकारणातील घोडेबाजार असतो तरी कसा? जाणून घ्या सर्व काही…

Next Post
what is horse trading

राजकारणातील घोडेबाजार असतो तरी कसा? जाणून घ्या सर्व काही...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!