मुक्तपीठ टीम
बंडखोरीनंतर शिंदे गटाला अखेर पहिल्यांदा केंद्र सरकारच्या कारभारात अधिकृतरित्या जबाबदारी मिळाली आहे. शिंदे गटातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रातील माहिती व तंत्रज्ञान स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी असेलेल्या शशी थरुर यांची ही जागा एनडीएतील शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे.
कोण आहेत प्रतापराव जाधव?
- प्रतापराव गणपतराव जाधव हे महाराष्ट्रातील बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
- उद्धव ठाकरेंविरोधात बंड करून एकनाथ शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या खासदारांपैकी जाधव हे एक आहेत.
- पंधराव्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता.
- खासदार होण्यापूर्वी त्यांनी सरपंच ते आमदार अशी विविध पदे भूषवली आहेत.
- ते सेना भाजप सरकारमध्ये राज्यमंत्रीही होते.
- ते शारंगधर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.
प्रतापराव जाधव यांनी केले मातोश्रीवर गंभीर आरोप-
- काही दिवसांपूर्वीच प्रतापराव जाधव यांनी मातोश्रीवर गंभीर आरोप केले होते.
- कुठे आहे तो वाझे.. कुठे आहे अनिल देशमुख… यांच्याकडून ‘मातोश्री’वर दर महिन्याला १०० खोके जायचे, असे वक्तव्य जाधव यांनी केले होते.
- त्यावरुन बराच वाद झाला होता.
- त्यानंत प्रतापराव जाधव यांनी आपल्या विधानावर सारवासारव केली होते.
- मातोश्रीवर १०० खोके जायचे असं मला म्हणायचं नव्हतं, असे त्यांनी सांगितले.