Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिलांच्या डिजिटल आर्थिक साक्षरतेकरिता जागतिक महिला बँकेसोबतचा सामंजस्य करार उपयुक्त – डॉ.हेमंत वसेकर

November 26, 2022
in Uncategorized
0
सामंजस्य करार 1

मुक्तपीठ टीम

“महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जागतिक महिला बँक यांच्यामध्ये काल महत्त्वाचा सामंजस्य करार झाला. या करारामुळे उमेद अभियानांतर्गत कार्यरत सर्व ग्रामीण महिला आर्थिक साक्षर होऊन सक्षम होण्यास मदत होणार आहे”, असे प्रतिपादन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी केले.            

जागतिक महिला बँकेच्या क्षेत्रीय प्रमुख कल्पना अजयन आणि इतर सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार नवी मुंबई येथील सिडको कव्हेन्शन सेंटर येथे झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.             

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण व दुर्बल भागामध्ये बँकेच्या सुविधा पोहचविण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर बी. सी. (बँक कोऑर्डिनेटर) सखी कार्यरत करण्यात येत आहे. या बी.सी. सखी ग्रामीण भागातील लोकांना बँकेतून पैसे काढणे, बील भरणा करणे व विविध विमा योजना यासारख्या सुविधा घरपोच पोहोचविते. या सुविधामधून बी. सी. सखीना बँकेद्वारे उपजीविकेच्या संधी प्राप्त होतात.  महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामीण व्यक्तीला बँकेच्या सुविधा प्राप्त व्हाव्यात याकरिता या सखी कार्यरत करण्यात येत आहे.            

हा उपक्रम जलद गतीने होण्याकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे जागतिक महिला बँकेसोबत सामंजस्य करार करण्यात करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ.वसेकर यांनी या करारामुळे राज्यभरातील अभियानाला जोडलेल्या महिलांची आर्थिक साक्षरता वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मदतीने ग्रामीण महिलांची कौशल्य वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन केले.            

जागतिक महिला बँकेच्या क्षेत्रीय प्रमुख कल्पना अजयन यांनी उमेद अभियानाच्या चळवळी सोबत काम करून ग्रामीण महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची ही संधी असल्याचे सांगितले.             

सदर कराराच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, धनवंत माळी, राज्य व्यवस्थापक, कावेरी पवार, अभियान व्यवस्थापक, धनश्री बिरंबोले तसेच जागतिक महिला बँकेकडून कल्पना अजयन, विभागीय प्रमुख पल्लवी मधोक, संचालक, अजित अग्रवाल, प्रवीण वानखडे व नारायण खोसे उपस्थित होते.


Tags: Dr Hemant Wasekarजागतिक महिला बँकडिजिटल आर्थिक साक्षरताडॉ.हेमंत वसेकर
Previous Post

सेंट्रल लायब्ररीच्या कामात शासनाला १०७ कोटींचा अतिरिक्त फटका

Next Post

महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांकरिता अचूक विधानसभा मतदार याद्या करा – राज्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे

Next Post
मा. निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची पत्रकार परिषद 1

महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांकरिता अचूक विधानसभा मतदार याद्या करा - राज्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!