मुक्तपीठ टीम
मोटोरोला एज एस प्रो स्मार्टफोन ३ रंगांमध्ये आणि ४ स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मोटोरोला एज एस प्रो हा फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा अतिशय स्लीम आणि वजनाने हलका स्मार्टफोन आहे. मोटोरोलाचा दावा आहे की मोटोरोला एज एस प्रो हा सर्वात स्लीम फ्लॅगशिप फोन आहे. मोटोरोला एज एस प्रोची जाडी ७.९९ मिमी आहे. तर वजन १८९ ग्रॅम आहे. हा फोन ३ कलर ऑप्शन आणि व्हेरिएबल स्टोरेज ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
मोटोरोला एज एस स्मार्टफोन या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झाला होता. स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर सपोर्ट असलेला हा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन होता. मात्र, आता कंपनीने मोटोरोला एज एस प्रो हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
मोटोरोला एज एस प्रो ची किंमत
- ६GB RAM + १२८GB = ३७१ डॉलर (२७,५०० रुपये )
- ८GB RAM + १२८GB = ४१८ डॉलर (३०,९८८ रुपये)
- ८GB RAM + २५६GB = ४६४ डॉलर (३४,६९५ रुपये)
- १२GB RAM + २५६GB = ५११ डॉलर (३७,८८८ रुपये)
मोटोरोला एज एस प्रो स्मार्टफोनमध्ये ६.७-इंच १०-बिट OLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट १४४Hz आणि टच सॅम्पलिंग रेट ५७६Hz आहे. हे ड्युअल पंच-होल एलसीडी पॅनेलसह येईल. फोन HDR10+ला सपोर्ट करेल. फोन स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेटसह मिळेल. फोनमध्ये १२GB टर्बो LPDDR5 रॅम आणि 56GB टर्बो UFS ३.१ स्टोरेज आहे.
मोटोरोल एज एस प्रो स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर १०८MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय ८ एमपी लेन्स आणि १६ एमपी अल्ट्रावाईड अँगल लेन्स देण्यात आले आहेत. ७ मॅक्रो लेन्स आहेत. सेल्फीसाठी ३२ एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये ४५२०mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हे ३०W टर्बोपावर फास्ट चार्जिंगसह उपलब्ध आहे. हा फोन अँड्रॉइड ११ आधारित MYUI 2.0 वर काम करेल.