मुक्तपीठ टीम
हँडसेट निर्माता मोटोरोलाने आपला नवीन बजेट स्मार्टफोन मोटो ई २० लाँच केला आहे. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, या नवीनतम मोटो ई २० मध्ये एचडी प्लस डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय हा फोन अँड्रॉइड ११ गो एडिशनवर काम करतो. या नव्या मोटोरोला मोबाईल फोनमध्ये ६.५ इंच मॅक्सव्हिजन एचडी+ (७२०x१६०० पिक्सेल) डिस्प्ले आहे, त्याचा रिफ्रेश रेट ६० एचझेड आहे आणि अॅस्पेक्ट रेशो २०:९ आहे.
प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेजविषयी सविस्तर माहिती
- २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी ऑक्टा-कोर युनिसॉक टी ६०६ एसओसी, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवणे शक्य आहे.
- फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर दोन मागील कॅमेरे देण्यात आले आहेत.
- १३ मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर सोबत, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.
- फोनमध्ये ४जी, ब्लूटूथ, वाय-फाय, मायक्रो-यूएसबी, जीपीएस, ए-जीपीएस आणि ३.५ मिमी हेडफोन जॅक समाविष्ट आहे.
- सुरक्षेसाठी, फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आणि डिव्हाइसमध्ये गुगल असिस्टेंटसाठी वेगळे बटण आहे.
- धूळ आणि पाणी प्रतिरोधनासाठी आयपी५२ रेटिंग ही आहे.
स्मार्टफोन अँड्रॉइड ११ गो एडिशनवर काम करतो. ४०००एमएएच ची बॅटरी यामध्ये आहे, जी १० वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. मोटोरोला ब्रँडच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत जवळजवळ ८,७०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत फोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज प्रकारांसाठी आहे. फोनचे दोन कलर व्हेरिएंट, ग्रेफाइट ग्रे आणि कोस्टल ब्लू लाँच करण्यात आले आहेत.