मुक्तपीठ टीम
मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन मोटो G42 आज भारतात लाँच झाला आहे. फोनमध्ये IP52 रेट केलेले वॉटर-रेपेलेंट रेटिंग आहे. मोटो जी ४२मध्ये आस्पेक्ट रेशो एमॉलिड डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा आहे. यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६८० एसओसीवर चालतो आणि त्यात २०वॉट फास्ट चार्जिंग आहे.
- हा फोन अटलांटिक ग्रीन आणि मेटॅलिक रोझ अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
- फ्लिपकार्ट प्रमाणेच या फोनची विक्री ११ जुलैपासून निवडक रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल.
- मोटो G42 ची किंमत 4जीबी रॉम + ६४जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी १३,९९९ रुपये आहे.
- मोटो G42 वर लाँच ऑफरवर १,००० रुपयांची सूट आहे. जे SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध होईल.
मोटो G42चे फिचर्स…
- मोटो G42ला ६.४-इंच फुल एचडी+ एमॉलीड डिस्प्ले आहे.
- हा फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येईल ज्यामध्ये एफ/१.८ लेन्ससह ५०-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर, ८-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि डेप्थ शूटर तसेच २-मेगापिक्सेल मॅक्रो शूटर समाविष्ट आहे.
- सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, मोटो G42 फ्रंट १६-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सरसह आहे, ज्यामध्ये एफ/२.२ लेन्स आहे.
- मोटो G42मध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत आणि त्यात डॉल्बी ऑटोमोससाठी सपोर्ट समाविष्ट आहे.
- मोटो G42 मध्ये ६४जीबी ऑनबोर्ड स्टोरेज पॅक आहे जे मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.
- मोटो G42 वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ४जी एलटीई, वायफाय ८०२.११एसी, ब्लूथुट वी५.०, रेडिओ, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी, टाईप सी आणि हेडफोन जॅक समाविष्ट आहे.
- बोर्डवरील सेन्सर्समध्ये एक्सीलरोमीटर, एंबियंट लाईट, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर समाविष्ट आहे.
- फोन साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सरसह देखील उपलब्ध आहे.