Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

रस्त्यावरील फेरीवाल्यांसाठीची तारणमुक्त कर्ज योजना २०२४च्या डिसेंबरपर्यंत!

April 29, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
PM Swanidhi Yojana

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (पंतप्रधान स्वनिधी ) योजना अंतर्गत कर्जपुरवठा मार्च २०२२ नंतरही डिसेंबर २०२४ पर्यंत सुरु ठेवायला मंजुरी दिली असून, तारण -मुक्त वाढीव कर्ज , डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ आणि रस्त्यावरील विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबांचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासावर भर देण्यात आला आहे.

 

या योजनेच्या माध्यमातून रस्त्यावरील विक्रेत्यांना परवडणारी तारण-मुक्त कर्जे उपलब्ध करून दिली जात आहेत. या योजनेत ५,००० कोटी रुपये कर्ज देण्याची कल्पना होती. आजच्या मंजुरीमुळे कर्जाची रक्कम वाढून ८,१०० कोटी रुपये झाली आहे. यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाचा आणखी विस्तार करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे.

 

विक्रेत्यांना कॅशबॅकसह डिजिटल पेमेंटच्या प्रोत्साहनासाठी वाढीव खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे देशातील शहरी भागातील सुमारे १.२ कोटी नागरिकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे..

 

पंतप्रधान स्वनिधी अंतर्गत, उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. २५ एप्रिल, २०२२ पर्यंत, ३१.९ लाख कर्ज मंजूर केली आहेत आणि २,९३१ कोटी रुपयांची २९.६ लाख कर्ज वितरित केली आहेत. दुसऱ्या कर्जाच्या बाबतीत , २.३ लाख कर्ज मंजूर करण्यात आली असून ३८५ कोटी रुपयांची १.९ लाख कर्जे वितरित करण्यात आली आहेत. लाभार्थी फेरीवाल्यांनी १३.५ कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार केले आहेत आणि त्यांना १० कोटी रुपयांचा कॅशबॅक देण्यात आला आहे. ५१ कोटी रुपये व्याजात सवलत म्हणून दिले आहेत.

 

योजनेचा प्रस्तावित विस्तार आवश्यक होता कारण जून २०२० मध्ये ही योजना सुरू होण्यास कारणीभूत असलेली परिस्थिती म्हणजे महामारी आणि छोट्या उद्योगांवरील संबंधित ताण अद्याप पूर्णपणे दूर झालेला नाही. डिसेंबर २०२४ पर्यंत कर्ज देण्याची मुदत वाढवल्यामुळे औपचारिक कर्ज सहाय्य प्रवेश सुलभ होईल , त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या विस्ताराची योजना आखण्यात मदत होईल, डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ होईल आणि कर्ज देणाऱ्या संस्थांवरील संभाव्य थकित कर्जाचा प्रभाव कमी करण्यात मदत होईल तसेच रस्त्यावरील विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबांचे सर्वांगीण सामाजिक-आर्थिक उत्थान शक्य होईल.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Ministry Of Housing And Uran AffairsMortgage Free Loan SchemeMY GovtPM Swanidhi YojanaPrime Street Vendors Self-Reliance Fundतारणमुक्त कर्ज योजनापंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी
Previous Post

सोशल मीडियाची महाशक्ती! तरुणाच्या प्रयत्नांनी ‘शिक्षक’ डिलिव्हरी बॉयना नवी मोटर सायकल!

Next Post

मुंबई शहरात १३४ ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार! ‘महाप्रित’चा प्रयत्न!

Next Post
EV Charging Station By MAHAPREIT

मुंबई शहरात १३४ ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार! ‘महाप्रित’चा प्रयत्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!