मुक्तपीठ टीम
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करत असताना केंद्र सरकारने देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबवले. भारतीयांनी या अभियानाला प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी भारतभर वातावरण तिरंगामय झालं होतं. या अभियानाच्या यशाची उत्तुंगता संबंधित संकेतस्थळावर अपलोड झालेल्या पाच कोटींहून अधिक सेल्फींमुळे येत आहे.
Thank you, India –
For furthering the clarion call of Hon Prime Minister Shri @NarendraModi ji to join the ‘#HarGharTiranga‘ movement and for the more than 5 Crore selfies with the Tiranga. It reflects our will to keep India at the top as the Supreme Nation.#AmritMahotsav
1/2 pic.twitter.com/h2cnODL3nk— G Kishan Reddy (@kishanreddybjp) August 15, 2022
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षाला प्रारंभ होत असताना ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत संस्कृति मंत्रालयाच्या विभागीय मंत्रालयाने आयोजित केलेल्या हर घर तिरंगा उपक्रमाची पूर्तता होत आहे. १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण झालेल्या ७५ आठवड्यांची पूर्तता करत तिरंग्याशी वैयक्तिकपणे अजोड दीर्घ नाते जोडण्यासाठी समर्पित असलेल्या या उपक्रमाने सर्व ठिकाणच्या भारतीयांना अमृत काल (आतापासून पुढील २५ वर्षे भारत@२०४७) दरम्यान राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी प्रतिबद्धता दर्शविण्यासाठी घरी किंवा त्यांच्या कार्याच्या ठिकाणी ध्वज प्रदर्शित करण्याचे आवाहन केले होते.
या उपक्रमासाठी हायब्रीड पध्दतीने तयार करण्यात आलेल्या विशेष संकेतस्थळावर ध्वजासोबत आपले भौतिक आणि भावनिक नाते वैयक्तिक स्वरुपात दृढ करण्यासाठी एका संघटीत भावनेने तसेच देशप्रेमाची भावना एकत्रितपणे अधोरेखित करण्यासाठी आपली सेल्फी अपलोड करण्याचे तसेच लोकांना त्यांच्या IP वर आधारित स्थानावर डिजिटलपणे ‘पिन अ फ्लॅग’ अपलोड करण्याचे सूचित करण्यात आले होते.
पंतप्रधान मोदींनी आज सकाळी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या त्यांच्या भाषणात असे नमूद केले की, गेल्या काही दिवसांपासून देशाने एक नवचैतन्य उदयास येताना पाहिले आणि अनुभवले,जिने आपल्या एकत्रित भावनेची पुनर्स्थापना केली आणि या भावनेचे पुनर्जागरण हे देशाचे मौलिक ऐश्वर्य आहे आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाला मधुर फळे आता लगडलेली दिसत आहेत.
माननीय पंतप्रधानांनी दिनांक २२ जुलै २०२२ रोजी घरोघरी राष्ट्रध्वज फडकावून किंवा प्रदर्शित करून ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सामील होण्याचे आवाहन केले होते.
५ कोटी तिरंगा सेल्फींची पूर्तता आज दुपारी ४ वाजता पूर्ण झाली असून भारताच्या इतिहासातील हा विशेष क्षण संपूर्ण भारत आणि जगभरातील प्रत्येकाच्या सहभागामुळे साजरा झाल्याबद्दल पाठविणार्या सर्वांना धन्यवाद.१२ मार्च २०२१ रोजी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या अमृत कालावधीचा ७५ आठवड्यांचा स्मरणोत्सव म्हणून १५ ऑगस्ट २०२२ रोजी सुरू झालेला हा उपक्रम १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू राहील.
मैलाचा दगड ठरलेल्या या विशेष उपक्रमाबद्दल आपले विचार प्रदर्शित करताना, सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर राज्य विभाग मंत्री, श्री किशन रेड्डी म्हणाले, “५ कोटी तिरंगा सेल्फी राष्ट्राला अग्रेसर आणि नेहमीच अग्रभागी ठेवण्याऱ्या कर्तव्यदक्ष भारतीयांच्या सामूहिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब दाखवितात.धन्यवाद, भारतीयांनो! मातृभूमी बद्दल आपुलकी आणि सामूहिक अभिव्यक्ती यांना जोडणारा खरोखरच हा एक विशेष क्षण आहे. मी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो!”
त्यांनी असेही सूचित केले की एक उपक्रमशील निर्मिती म्हणून, संकेतस्थळावर लोकांना त्यांच्या IP वर आधारित स्थानावर डिजिटलपणे ‘पिन अ फ्लॅग’ करण्याची परवानगी दिली होती.या उपक्रमाद्वारे संपूर्ण भारत तसेच जागतिक स्तरावरील भारतीयांच्या सहभागाने ५ कोटींहून अधिक पिन्सचा टप्पा ओलांडून आपल्या राष्ट्र भावनेचे भव्य प्रदर्शन केले.
“मी तरुणांना त्यांच्या आयुष्यातील पुढील २५ वर्षे राष्ट्राच्या विकासासाठी समर्पित करण्याचे आवाहन करत आहे,”असेही पंतप्रधान मोदी आपल्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाले होते. आम्ही संपूर्ण मानवतेच्या विकासासाठी काम करू. हेच भारताचे सामर्थ्य आहे.”
‘ध्वजासह 5 कोटी सेल्फी’ या भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याच्या आणि भारताला सर्वोच्च राष्ट्र बनवण्याच्या ५ कोटी संकल्पांची साक्ष देत आहेत.