मुक्तपीठ टीम
देशात यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र देशात तौक्ते आणि यास वादळ धडकल्याने मान्सूनचं आगमन काही दिवसांनी पुढे गेलं आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्प निर्माण होत आहे, त्यामुळेच पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत आयएमडीचे माजी प्रमख हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी माहिती दिली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विशेषतः कोल्हापूर, सांगली ,सातारा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडू शकतो. हवामान तज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सुन केरळमध्ये ३ जूनला दाखल होईल. यामुळे मान्सून राज्यात दाखल होण्यास देखील चार ते पाच दिवसांचा विलंब होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
केरळमध्ये मान्सुन ३ जूनला दाखल होण्याची शक्यता
Latest meteorological conditions, south-westerly winds could strengthen further gradually frm 1st June,resulting in likely enhancement in RF activity ovr Kerala.Hence monsoon onset over Kerala is likely to take place by 03June
– IMD pic.twitter.com/HE52Sn1Kbk— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 30, 2021
३ जूनला मान्सून केरळ पोहोचणार-
- भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता.
- हवामान विभागानं यापूर्वी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते.
- मात्र, सद्याची बदलेली परिस्थिती पाहता मान्सून ३ जूनला रोजी केरळात दाखल होईल.