मुक्तपीठ टीम
एकीकडे कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असून आता मात्र शाळा सुरु झाल्यावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वर्षांनी शाळा सुर झाल्यावर पहिल्याच दिवशी शिक्षकांच्या पेश्याला काळीमा फासणारी घटना चंद्रपुरात घडली आहे. चंद्रपुरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्याच दिवशी चक्क मुख्याध्यापकांनी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा विनयभंगाचा प्रयत्न केला आहे.
नेमकं प्रकरण काय
- राज्यभरात शाळा सुरू झाल्या आहेत.
- चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक भाऊराव तुमडे यांनी इयत्ता पाचवीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे.
- या घटनेनंतर गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले आहे.
- शाळेचा पहिला दिवस असल्याने या शाळेत फक्त काही विद्यार्थी-विद्यार्थिनी आले होते.
- पीडित विद्यार्थीनी इयत्ता पाचवीत शिकते.
- मुख्याध्यापकांनी वर्गातील इतर मुलांना साफसफाईसाठी बाहेर पाठविले.
- आणि त्या आदिवासी मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
- पीडित मुलीने ही माहिती आधी मैत्रिणींना सांगितली व त्यांनी पालकांना माहिती दिली.
- माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शाळेत धाव घेत मुख्याध्यापक तुमडे यांना खोलीत बंद केले. यानंतर पोलिसांना तक्रार केली.
- पंचायत समिती बल्लारपूरचे गटशिक्षण अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.
- उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार देखील घटनास्थळी दाखल.
- बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहून कारवाई केली आणि जमावाला हुसकावून लावले.
- बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
- शाळेतील ७ विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल केला.
- यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकांना ताब्यात घेतले. पोलीस पोहोचल्याने या गावात मोठा अनर्थ टळला.
- या संतापजनक घटनेचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत.
१) वर्षा पिपरे , गटशिक्षणाधिकारी, बल्लारपूर
२) उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बल्लारपूर पो. स्टे.