मुक्तपीठ टीम
भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केलेला आरोप सध्या चर्चेचा विषय झाला आहे. शुक्रवारी रात्री त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर संतापलेल्या मोहित कंबोज यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर थेट मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, “पोलीस आयुक्त संजय पांडे हे सरकारपुढे लाचारीने वागत आहेत. भाजपा नेत्यांविरोधात हल्ले होऊ देत आहेत. कारण त्यांना शिवसेनेने पूनम महाजनांविरोधात लोकसभेची उमेदवारी देण्याचं वचन दिलं आहे.”
संजय पांडेंची अशी लाचारी का?
- संजय पांडे पोलीस महासंचालक असताना सोमय्यांवर पुण्यात हल्ला झाला.
- आता संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना सोमय्यांवर
- मुंबई पोलिसांच्या इतिहासात एवढे कमजोर पोलीस आयुक्त झाले नाहीत.
- माझ्यावरील हल्ल्याला २७ तास उलटले तरी हल्लेखोर पकडलेले नाहीत, एफआयआर नाही, मला साधा पोलिसांचा फोन आलेला नाही.
- आम्ही १४ आमदार पोलीस आयुक्तांना भेटलो.
- पोलीस आयुक्त संजय पांडे हे सरकारपुढे लाचार आहेत.
- अशी कोणती लाचारी आहे की आयुक्त संजय पांडे यांची की पू्र्ण मुंबईत कायदा सुव्यवस्था संपली आहे.
- अशी कोणती लाचारी आहे की उद्धव ठाकरेंना मातोश्रीसमोर शिवसैनिक ठेवावे लागतात, पोलिसांवर विश्वास नाही.
- जेव्हा ते पोलीस महासंचालक होते तेव्हा सोमय्यांवर पुण्यात हल्ला झाला.
- हेमंत नगराळे पोलीस आयुक्त असताना हल्ले झाले नाहीत, संजय पांडे आल्यानंतर हल्ले झाले.
पूनम महाजनांच्याविरोधात संजय पांडेंना शिवसेनेची उमेदवारी?
- संजय पांडे सुपारी घेऊन भाजपा नेत्यांवर हल्ले करू देत आहेत.
- जूननंतर ते निवृत्त होतील, त्यानंतर त्यांना पूनम महाजनांच्याविरोधात खासदारकी लढवण्याचं वचन शिवसेनेने दिलं आहे.
- त्यामुळे ते आपल्या पदाशी तडजोड करत वागत आहेत.
- त्यांचा आम्ही निषेध करतो.