Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोहाली एमएमएस प्रकरण: नग्न व्हिडीओंसाठी ब्लॅकमेलिंग करणारा लष्करी जवान जेरबंद!

September 5, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Mohali MMS Case

मुक्तपीठ टीम

पंजाबमधील चंदीगड विद्यापीठात विद्यार्थिनींच्या अंघोळीचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी चौथी अटक केली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी माहिती दिली की पंजाब पोलिसांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशमध्ये तैनात असलेल्या एका सैनिकाला अटक केली आहे. संजीव सिंग असे अटक केलेल्या सैनिकाचे नाव असून, तो विद्यार्थीनीला ब्लॅकमेल करत असल्याचा संशय आहे.

पोलीस या जवानाला मोहालीला आणत आहेत. असे सांगितले जात आहे की, लष्कराचा जवान आरोपी तरुणीला व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत असे. अटक करण्यात आलेला जवान हा जम्मूचा रहिवासी आहे.

लष्कराचा जवान तरूणीला व्हिडीओ बनवण्यास भाग पाडत असे…

  • अरुणाचल प्रदेशातील एटा नगरजवळ तैनात असलेला जम्मूचा रहिवासी आर्मी जवान संजीव आरोपी तरुणीला व्हिडीओ बनवण्यासाठी ब्लॅकमेल करत असे.
  • वसतिगृहातील इतर मुलींचे व्हिडीओ बनवण्यासाठी लष्कराचा जवान तरुणीवर दबाव टाकत होता.
  • आरोपी मुलीच्या प्रियकराने लष्कराच्या जवानाला तिचा व्हिडीओ पाठवला होता.
  • लष्करातील जवान तो व्हिडीओ लिक करण्याची धमकी देऊन व्हिडीओ बनवण्यासाठी दबाव टाकत होता.
  • तपासा करत असताना पोलिसांनी सांगितले की, मुलीने वसतिगृहातील इतर मुलींचे व्हिडीओ बनवले नाहीत.

लष्कराच्या जवानाचे नाव कसे समोर आले?

  • पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याचा फोन तपासला असता याप्रकरणात लष्कराच्या जवानाच्या भूमिकेची माहिती समोर आली.
  • तपासात आरोपी विद्यार्थिनीशी व्हॉट्सअॅप चॅट्सचे काही कथित स्क्रीनशॉट देखील सापडले, ज्यावरून असे दिसून आले की व्हिडिओ बनवण्यासाठी तिला ब्लॅकमेल केले जात आहे.
  • त्यानंतर चौथ्या संशयिताचेही नाव तपासादरम्यान पुढे आले.

एसआयटीने तिन्ही आरोपींची चौकशी केली… सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली

  • पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने चंदीगड विद्यापीठात आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींची चौकशी केली.
  • मोहालीतील खरार येथील न्यायालयाने विद्यार्थिनीसह तिन्ही आरोपींना सोमवारी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
  • पोलीस उपमहानिरीक्षक जीपीएस भुल्लर म्हणाले की, एसआयटी आणि फॉरेन्सिक तज्ञांनी चंदीगड विद्यापीठाच्या सार्वजनिक सुविधांनाही भेट दिली आहे.
  • वसतिगृहाच्या वॉर्डनलाही चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे भुल्लर यांनी सांगितले.
  • पंजाब पोलिसांच्या राज्य सायबर सेलकडून तिन्ही आरोपींच्या मोबाइल फोनचा डेटा मिळवला जाईल, असे ते म्हणाले.
  • या व्हिडीओबाबत विद्यार्थिनींच्या आरोपांची एसआयटी चौकशी करेल, असे भुल्लर म्हणाले. कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही, असे ते म्हणाले.

Tags: Army Jawan JailedBlackmailingChandigarhMohali MMS CasemuktpeethObscene VideoUniversity of Punjabअश्लील व्हिडीओकायदा पोलीसघडलं-बिघडलंचंदीगड विद्यापीठपंजाबब्लॅकमेलिंगमुक्तपीठमोहाली एमएमएस प्रकरणलष्करी जवान जेरबंद
Previous Post

अखेर ठरलं! जाणून घ्या कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री…

Next Post

धक्कादायक! माजी मंत्री बाबु सिंहचा दहशतवाद्यांशी संगनमत करून काश्मीरला वेगळा देश बनवण्याचा कट!

Next Post
Ex-Minister Babu Singh

धक्कादायक! माजी मंत्री बाबु सिंहचा दहशतवाद्यांशी संगनमत करून काश्मीरला वेगळा देश बनवण्याचा कट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!