Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोदी सरकारचा रिझर्व्ह बँकेला प्रश्न: आटोक्यात का येत नाही महागाई?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
RBI

मुक्तपीठ टीम

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या सर्व प्रयत्नांनंतरही, महागाई सलग ९व्या महिन्यात समाधानकारक पातळीच्या वर आहे. यामुळे मोदी सरकारने आरबीआयला महागाई आटोक्यात का येत नाही? असा प्रश्न केला आहे. आरबीआयला यावरून आता केंद्र सरकारला अहवाल द्यावा लागेल आणि त्याचे कारण सविस्तर सांगावे लागेल. महागाई निर्धारित मर्यादेत का ठेवता आली नाही आणि ती आटोक्यात आणण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, हे या अहवालात स्पष्ट करावे लागणार आहे. २०१६ मध्ये चलनविषयक धोरण आराखडा अंमलात आल्यानंतर ही पहिलीच वेळ असेल, आरबीआयला अहवालाद्वारे सरकारला त्यांच्या पावलांची माहिती द्यावी लागेल. येथे, नॅशनल स्टॅटिस्टिकल मिनिस्ट्री (NSO) नुसार, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये फक्त ६ वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत.

किरकोळ महागाई आटोक्यात आणण्याची जबाबदारी!!

किरकोळ महागाई दर २ टक्क्यांच्या फरकासह ४ टक्के राखण्याची जबाबदारी आरबीआयकडे सोपवण्यात आली आहे.

नियम काय सांगतो?

रिझव्‍‌र्ह बँक कायद्यानुसार, सलग तीन तिमाहीत चलनवाढीचे उद्दिष्ट गाठले नाही, तर आरबीआयने केंद्र सरकारला अहवाल देणे आवश्यक आहे.

किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या वर, खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याचा परिणाम

  • खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई ७.४१ टक्क्यांवर पोहोचली.
  • यंदाच्या एप्रिलपासूनचा हा पाच महिन्यांचा उच्चांक आहे.
  • त्यावेळी किरकोळ किमतींवर आधारित महागाई (CPI) ७.७९ टक्के होती.
  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये सलग ९व्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर आरबीआयच्या ६ टक्क्यांच्या वरच्या मर्यादेच्या वर राहिला.
  • ऑगस्टमध्ये ते ७ टक्के आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ४.३५ टक्के होते.
  • ऑगस्टमधील ७.६२ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई ८.६० टक्क्यांवर पोहोचली.
  • केंद्र सरकारने आरबीआयला किरकोळ महागाई २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे लक्ष्य दिले आहे.

किरकोळ महागाई: या वस्तूंच्या किमती वाढल्या

  • सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई ७.४१ टक्क्यांवर पोहोचली, जी अपेक्षेपेक्षा जास्त होती.
  • तज्ज्ञांनी कमाल किरकोळ महागाई ७.३० टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला होता.
  • नॅशनल स्टॅटिस्टिकल मिनिस्ट्री (NSO) नुसार, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये फक्त ६वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत.
  • त्याचबरोबर इतर सर्व वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे.
  • यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई अपेक्षेपेक्षा जास्त होती.

तृणधान्ये, भाजीपाला, डाळी, दूध यासह अन्य वस्तू महागल्या 

उत्पादन         सप्टेंबर         ऑगस्ट
तृणधान्ये          ११.५३%       ९.५७%
मांस-मासे        २.५५%         ०.९८%
दूध                 ७.१३%          ६.३९%
भाजी              १८.०५%        १३.२३%
डाळ              ३.०५%           २.५२%
मसाले           १६.८८%          १४.९०%
अन्न-पेय         ८.४१%              ७.५%
फॅब्रिक          ९.९०%             ९.५८%
पादत्राणे         १२.३०%           ११.८५%
गृहनिर्माण      ४.५७%              ४.०६%
अंडी –         -१.७९%             -४.५७%
आरोग्य          ५.५२%              ५.४३%
तेल-चरबी, इंधन-वीज, फळे, साखर यातील महागाई ऑगस्टच्या तुलनेत कमी झाली आहे.

या राज्यांमध्ये सर्वाधिक महागाई

  • आकडेवारीनुसार, पश्चिम बंगाल, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये किरकोळ महागाईचा दर सर्वाधिक होता. या राज्यांमध्ये हा दर ८.०६ टक्के ते ९.४४ टक्के इतका होता.
  • दिल्ली, हिमाचल प्रदेश, ओडिशा, कर्नाटक आणि बिहार ही सर्वात कमी महागाई असलेली राज्ये होती. येथे महागाई ४.०३% ते ६.३८% दरम्यान होती.
  • उत्तर प्रदेशात हा दर ७.७९ टक्के होता. हरियाणा ७.९५ टक्के, उत्तराखंड ७.२७ टक्के आणि पंजाब ५.६० टक्के नोंदवले गेले.

Tags: inflationModi govtRBIआरबीआयमहागाईमोदी सरकार
Previous Post

महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून अभिनंदन

Next Post

ऊसतोड मजूरांकडील गोवंशीय पशुधनाचे लम्पी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

Next Post
radhakrishna-vikhe-patil

ऊसतोड मजूरांकडील गोवंशीय पशुधनाचे लम्पी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!