Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मोदी सरकारचं दुसरं पर्व भलतंच महागडं, तीन वर्षात घरातील गॅस सिलिंडर २९० रुपयांनी महाग!

दुसरी बार मोदी सरकार, बढ गई महंगाई की मार!

May 7, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Lpg domestic cylinder price hike 7-5-22

मुक्तपीठ टीम

“बस हो गई महंगाई की मार, अब की मार मोदी सरकार!” या घोषणेसह सत्तेत आलेल्या मोदी सरकारचं दुसरं पर्व हे महागाई भडकवणारं ठरलं असल्याचं दिसत आहे.  पुन्हा सत्तेत आल्यानंतर गेल्या तीन वर्षात तब्बल २९० रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर महागला आहे. या ३६ महिन्यांमध्ये अपवाद वगळला गॅस सिलिंडरची महागाई ही भडकतीच राहिली आहे. अपवादही घडले ते प्रामुख्याने निवडणुकीच्या कालावधीतच! त्यामुळे आता “दुसरी बार मोदी सरकार, बढ गई महंगाई की मार!” अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

मेच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत १०९ रुपयांनी वाढल्यानंतर आपल्याला काय त्याचं असं वाटणाऱ्यांना आज चांगलाच धक्का बसला. घरातील स्वयंपाक करणं आता  महाग झाले आहे. १४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली. आता मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९९९ रुपये ५० पैसे झाली आहे. यापूर्वी २२ मार्च रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

 

व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग होण्याचाही आपल्याला फटका!

मार्चमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर १ एप्रिल रोजी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्या दिवशी त्याची किंमत २४९ रुपये ५० पैसे प्रति सिलिंडरने वाढवली होती. यानंतर मुंबईत या सिलिंडरची किंमत २२५३ रुपयांवर गेली होती. यानंतर १ मे २०२२ रोजी व्यावसायिक एलपीसी गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर १०४ रुपयांनी वाढ करण्यात आली. खरंतर या सिलिंडरच्या किंमत वाढीचाही फटका तुम्हाला आम्हाला बसतो. कारण ते महागल्यानंतर हॉटेल, खानावळी, रस्त्यावरील अन्नपदार्थ विकणारे फेरीवाल्यांनीही आपल्या पदार्थांचे भाव वाढवतात. त्यामुळे केवळ घरातील गॅस वाढीचा आपल्याला फटका बसत नाही तर आपण थेट वापरत नसलो तरी व्यावसायिक गॅस सिलिंडरची महागाईही तेवढाच फटका बसतो. त्यामुळे “दुसरी बार मोदी सरकार, डबल हो गई महंगाई की मार!” असंच दिसत आहे.

 

कसे महागत आहेत घरगुती गॅस सिलिंडर…जून २०१९ ते मे २०२२

  1. May 7, 2022  999.50
  2. March 22, 2022 949.50
  3. October 6, 2021 899.50
  4. September 1, 2021 884.50
  5. August 17, 2021 859.50 875.50
  6. July 1, 2021 834.50
  7. June 1, 2021 809.00
  8. May 1, 2021 809
  9. April 1, 2021 809
  10. March 1, 2021 819
  11. February 25, 2021 794
  12. February 15, 2021 769
  13. February 4, 2021 719
  14. January 1, 2021 694
  15. December 15, 2020 694
  16. December 2, 2020 644
  17. November 1, 2020 594
  18. October 1, 2020 594
  19. September 1, 2020 594
  20. August 1, 2020 594
  21. July 1, 2020 594
  22. June 1, 2020 590.5
  23. May 1, 2020 579
  24. April 1, 2020 714.5
  25. March 1, 2020 776.5
  26. February 12, 2020 829.5
  27. January 1, 2020 684.5
  28. December 1, 2019 665
  29. November 1, 2019 651
  30. October 1, 2019 574.5
  31. September 1, 2019 562
  32. August 1, 2019 590.5
  33. July 1, 2019 608.5
  34. June 1, 2019 709.5
  35. May 1, 2019 684.5
  36. April 1, 2019 678.5
  37. March 1, 2019 673.5                                                                                                                            आकडेवारी संदर्भ – इंडियन ऑइल

Tags: inflationlpg gasmodi sarkarगॅस सिलिंडरमहागाईमोदी सरकारस्वयंपाकाचा गॅस
Previous Post

राज्यात २५३ नवे रुग्ण, १३६ बरे! मुंबई १७२, पुणे ३३, ठाणे २२

Next Post

पोलिसांचं मन मोठं! डिलिव्हरी बॉयला उन्हात सायकल चालवताना पाहून मोटर सायकल भेट!!

Next Post
madhya Pradesh Police

पोलिसांचं मन मोठं! डिलिव्हरी बॉयला उन्हात सायकल चालवताना पाहून मोटर सायकल भेट!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!