Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“बालगृहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल”: ॲड. यशोमती ठाकूर

June 8, 2021
in सरकारी बातम्या
0
yashomati thakur

मुक्तपीठ टीम

शासनाच्या बालगृहात असणाऱ्या मुलांची देखरेख तसेच त्यांची दत्तक विधान प्रक्रिया सुलभपणे होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. सॉफ्टवेअर आणि ॲप विकसित करण्याबाबत मंत्री ॲड. ठाकूर यांच्यासमोर दोन स्वयंसेवी संस्थांनी सादरीकरण केले.

 

शासनाच्या बालगृहात असणाऱ्या मुलांचे चांगल्या कुटुंबात पुनर्वसनाच्या दृष्टीने दत्तक विधान प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्याचा प्रयत्न ‘व्हेअर आर इंडियाज चिल्ड्रन’ ही स्वयंसेवी संस्था करत आहे. याबाबत ॲड. ठाकूर यांनी आढावा घेत संस्थेचे प्रयत्न, प्रक्रिया, सॉफ्टवेअरबाबत माहिती घेतली. मूल दत्तक घेण्यास पालक उत्सुक असतात मात्र त्यांची फसवणूक होऊ नये, अवैधरित्या दत्तक देण्याचे प्रकार होऊ नये यासोबतच दत्तक घेण्याची प्रक्रिया सहज, सुलभ होणे गरजेचे आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, असे संस्थेच्या चित्रा बुझरुख यांनी सांगितले.

 

‘आंगण’ या संस्थेने बालगृहातील मुलांच्या देखरेखीसाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अँड्रॉईड ॲप विकसित करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. स्मिता धर्माणे यांनी सांगितले, बालन्याय कायद्यानुसार शासकीय, स्वयंसेवी संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या बालगृहांची निरीक्षण समितीमार्फत वर्षभरात चार वेळा तपासणी केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस करण्यासाठी ॲपचा वापर करता येऊ शकतो. ॲपमुळे ही माहिती तातडीने शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध होईल. मुलांच्या आरोग्याचे तपशील, शैक्षणिक प्रगतीबाबत अद्ययावत माहिती सादर झाल्याने आवश्यक मदत देणे, नवे उपक्रम राबवणे सुलभ होईल. राज्यात सध्या ४५० बालगृह असून ॲपमुळे कागदोपत्री होणारी प्रक्रिया जलद होऊ शकेल.

 

याबाबत बोलताना मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, दत्तक प्रक्रिया सोपी, सुलभ करणे तसेच जी बालके बालगृहात आहेत त्यांच्या सर्वांगीण प्रगतीकडे लक्ष देणे यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणे कौतुकास्पद आहे. अशा डिजिटल प्रयत्नामुळे किचकट काम सोपे आणि पेपरलेस होईल. याबाबत स्वयंसेवी संस्थांना शासन स्तरावरुन आवश्यक सहकार्य करण्यात येईल.

 


Tags: Adv. yashomati thakurअॅड. यशोमती ठाकूरआंगणडॉ. स्मिता धर्माणेव्हेअर आर इंडियाज चिल्ड्रन
Previous Post

आज १० हजार ८९१ नवे रुग्ण, राज्यात सर्वात कमी रुग्ण भंडाऱ्यात…फक्त ९!

Next Post

राज्यात मे मध्ये १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार

Next Post
nawab malik

राज्यात मे मध्ये १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!